मो. आमिरवरील बंदी आयसीसीकडून शिथिल
By Admin | Updated: January 30, 2015 00:45 IST2015-01-30T00:45:24+5:302015-01-30T00:45:24+5:30
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला आज, गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाच वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरा

मो. आमिरवरील बंदी आयसीसीकडून शिथिल
दुबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला आज, गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाच वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरा जात असलेल्या या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या २०१० च्या इंग्लंड दौऱ्यात २२ वर्षीय आमिरला स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याला क्रिकेटमध्ये ५ वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. आयसीसी बोर्डाच्या आज संपलेल्या दोनदिवसीय बैठकीनंतर आयसीसीने स्पष्ट केले की, ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी व सुरक्षा समितीचे अध्यक्ष सर रोनी फ्लानागन यांनी आयसीसी बोर्ड व पीसीबीशी चर्चा केल्यानंतर आपल्या अधिकारांचा वापर करीत आमिरला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली.’
मॅच फिक्सिंग प्रकरणात आमिरवरील पाच वर्षांच्या बंदीच्या शिक्षेची मुदत २ सप्टेंबर २०१५ मध्ये संपणार आहे; पण आता तो पाकच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणार आहे. (वृत्तसंस्था)
ण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
आयसीसीने स्पष्ट केले की, अध्यक्षांनी भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या कलम ६.८ मध्ये उल्लेख असलेल्या आपल्या अधिकाराचा वापर केला. ते आमिरच्या उत्तरवर समाधानी दिसले. चौकशीदरम्यान आमिरने सहकार्य केले. चौकशीदरम्यान आमिरने जे काही घडले ते सविस्तरपणे कथन केले आणि आपली चूक कबूल केली.
स्पॉट फिक्सिंग प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आमिरने आपली चूक कबूल केली होती, पण आसिफ व बट यांनी न्यायालचाये द्वार ठोठावले. त्यात त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. लंडनच्या न्यायालयाने दोघांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आसिफवर क्रिकेटमध्ये ७ वर्षांची तर बटवर १० वर्षांची बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)