मिशेल जॉन्सनची निवृत्ती

By Admin | Updated: November 18, 2015 04:03 IST2015-11-18T04:03:34+5:302015-11-18T04:03:34+5:30

आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्धच्या क सोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Mitchell Johnson's retirement | मिशेल जॉन्सनची निवृत्ती

मिशेल जॉन्सनची निवृत्ती

पर्थ : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्धच्या क सोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
पर्थ येथील वाका मैदानावर मंगळवारी पाचव्या दिवसाच्या खेळापूर्वी बोलताना ३४ वर्षीय जॉन्सन म्हणाला, ‘निवृत्ती स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. माझी कारकीर्द शानदार ठरली. पण कधी ना कधी हा प्रवास संपणार होता आणि वाकावर हा प्रवास थांबविणे विशेष आहे.’
यापूर्वी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेनंतर मायकल क्लार्क, ब्रॅड हॅडिन, रॅन हॅरिस, ख्रिस रोजर्स आणि शेन वॉटसन यांच्यासारख्या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी जॉन्सनच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली होती. कारण हा वेगवान गोलंदाज गेल्या आठवड्यात निवृत्तीबाबत विचार करीत असल्याचे म्हटले होते.
वाका जॉन्सनसाठी गृहमैदान आहे. ७३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत जॉन्सनने या मैदानावर अनेकदा चांगली गोलंदाजी केली आहे; पण न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. त्याला १५७ धावांच्या मोबदल्यात केवळ १ बळी घेता आला. या एकमेव बळीच्या जोरावर जॉन्सनने आॅस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ब्रेट ली याला पिछाडीवर सोडताना चौथे स्थान पटकावले. जॉन्सन ३११ बळींसह चौथ्या स्थानी आहे. आॅस्ट्रेलियातर्फे शेन वॉर्न (७०८), ग्लेन मॅक् ग्रा (५६३) आणि डेनिस लिली (३५५) यांनी जॉन्सनपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपल्या संघसहकाऱ्यांना या निर्णयाबाबत सांगताना जॉन्सन म्हणाला,‘मी या निर्णयावर बराच विचार केला. या सामन्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता आहे. बॅगी ग्रीनसाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)

क्वीन्सलॅँडतर्फे २००१ मध्ये
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉन्सनला २००७ मध्ये कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. स्थानिक क्रिकेटमध्ये तो पश्चिम आॅस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. जॉन्सनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी २००८ मध्ये वाका मैदानावर केली होती. त्या वेळी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६१ धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेतले होते. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून मान मिळवणाऱ्या जॉन्सनने १५३ वन-डे मध्ये २३९ बळी घेतले.

जॉन्सन म्हणाला, ‘मला कारकिर्दीत चढ-उतार अनुभवाला आले, पण मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मला अभिमान आहे.’

जॉन्सनने आॅस्ट्रेलियातर्फे
३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो तळाच्या फळीत उपयुक्त फलंदाज होता.
कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च खेळी आहे नाबाद १२३ धावांची. त्याने ११ अर्धशतके झळकावली आहेत.

Web Title: Mitchell Johnson's retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.