‘मिशन ऑस्ट्रेलिया’ आजपासून
By Admin | Updated: December 9, 2014 01:37 IST2014-12-09T01:37:51+5:302014-12-09T01:37:51+5:30
भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान उद्या, मंगळवारपासून प्रारंभ होणा:या कसोटी मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘ट्रेडमार्क’ आक्रमकता अनुभवाला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘मिशन ऑस्ट्रेलिया’ आजपासून
कसोटी मालिका : भावुक वातावरणात दमदार सलामीसाठी उभय संघ सज्ज; विराटच्या नेतृत्वाचा कस
अॅडिलेड : फिलिप ह्युजच्या अपघाती मृत्यूमुळे कसोटी मालिकेमध्ये आक्रमकतेचा अभाव दिसत असला तरी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान उद्या, मंगळवारपासून प्रारंभ होणा:या कसोटी मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘ट्रेडमार्क’ आक्रमकता अनुभवाला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी येथे दाखल झालेला भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामना खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनी अद्याप अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरलेला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कला पहिल्या लढतीसाठी फिट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
गेल्यावेळी 2क्11-12 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला येथे 4-क् ने पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी त्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ येथे दाखल झाला आहे; पण उद्या भारतीय खेळाडूंच्या मनात त्याबाबत विचारही येणार नाही. उभय संघ ज्यावेळी मैदानात दाखल होतील त्यावेळी भावनिक वातावरण असेल. अॅडिलेड ह्युजचे दुसरे घर होते. सामना सुरू होण्यापूर्वी ह्युजला श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने ह्युजला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी गेल्या दोन आठवडय़ांचा कालावधी खडतर होता. ह्युजच्या मृत्यूमुळे ऑस्ट्रेलियात शोकाकुल वातावरण होते आणि खेळाडूंसाठी क्रिकेट दुय्यम होते. मालिकेतील कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला. त्याला बीसीसीआयने मंजुरी प्रदान केली. या दु:खाच्या क्षणी कर्णधार क्लार्कने सर्वाना धीर देण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघ येथे दाखल झाला त्यावेळी क्लार्कच्या फिटनेसच्या मुद्दय़ावर पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करायची अथवा नाही ? याबाबत चर्वितचर्वण सुरू होते.
ह्युज दुखापतग्रस्त झाल्यानंतर क्लार्कने ऑस्ट्रेलियन क्रिकेट वतरुळाला धीर दिला. क्लार्क पहिला कसोटी सामना खेळणार असल्याचे निश्चित आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होणो किती अडचणीचे होते, याबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वारंवार मत व्यक्त केले आहे. डोक्याला बाऊंसर लागल्यानंतर ह्युजचा मृत्यू झाल्यामुळे त्यासाठी फलंदाजी करणो सोपे नाही. तीन दिवसांच्या सराव सत्रनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू आता सावरत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आक्रमक खेळ करणार असल्याचे स्पष्ट केले. भारतीय संघासाठी हा दौरा लांबला आहे, कारण भारतीय संघ दोन आठवडय़ांपासून पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा करीत आहे.
भारताने या दौ:याची सुरुवात सराव सामन्याने केली. त्यानंतर संघाला ऑस्ट्रेलियन संघ दु:खातून सावरण्याची प्रतीक्षा करावी लागली. काही दिवस सरावानंतर अॅडिलेडमध्ये दुसरा सराव सामना खेळला गेला. भारतीय संघाने भावनेवर नियंत्रण राखताना सरावावर लक्ष केंद्रित केले. गेल्या काही दिवसांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारताला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघ कसोटी मानांकनामध्ये सध्या सहाव्या स्थानी आहे. भारताने 2क्13 मध्ये वेस्ट इंडीजला भारतात पराभूत केले होते. त्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडने भारताचा 3-1 ने पराभव केला.
युवा भारतीय संघ विदेश दौ:यात चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड येथील वातावरण नवे होते. कारण काही खेळाडूंनाच येथे खेळण्याचा अनुभव होता.
ऑस्ट्रेलिया दौराही वेगळा नाही. सध्याच्या संघातील धोनी, कोहली, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, ईशांत शर्मा, आर. अश्विन आणि उमेश यादव येथे 2क्11 मध्ये खेळले होते. रहाणो व रोहित यांना तीन वर्षापूर्वी खेळण्याची संधी मिळाली नव्हती, पण गेल्या वर्षभरात हे खेळाडू विदेशात बरेच क्रिकेट खेळले. गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांचा अनुभव आहे. भारतासाठी महत्त्वाचा बदल नेतृत्वामध्ये आहे. धोनी वन-डे क्रिकेटमध्ये आक्रमक कर्णधार आहे; पण कसोटी क्रिकेटमध्ये विशेषत: विदेशात त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश लाभले नाही. या कसोटी सामन्यात कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे. धोनीच्या अनुपस्थितीत रिद्धिमान साहा त्याचे स्थान घेणार आहे. भारताने अतिरिक्त फलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला तर केवळ चार गोलंदाजांना संधी मिळणार आहे. भुवनेश्वरच्या खेळण्याबाबत साशंकता असून, ईशांत शर्मा, वरुण अॅरोन व मोहम्मद शमी यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटूंमध्ये रवींद्र जडेजा व आर. अश्विन प्रबळ दावेदार असतील. (वृत्तसंस्था)
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा,
सुरेश रैना, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन,
कर्ण शर्मा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, वरुण अॅरोन,
उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, के. एल. राहुल, नमन ओझा, एम. एस. धोनी.
ऑस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ािस रोजर्स, शेन वॉटसन, स्टिव्ह स्मिथ, मिशेल मार्श, ब्रॅड हॅडिन, मिशेल जॉन्सन, रॅन हॅरिस, पीटर सिडल, नॅथन लियोन, जोश हेजलवुड, दिवंगत फलिप ह्युज (मानद 13 वा खेळाडू).
नो ‘डीआरएस’
पंचांच्या निर्णय समीक्षा पद्धतीला भारताचा विरोध कायम असल्याने उद्यापासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत डीआरएसचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने नेहमी या पद्धतीला विरोध केला असून, पुढेही हीच स्थिती कायम राहील, असे प्रभारी कर्णधार विराट कोहली याने सांगितले. या पद्धतीत असलेल्या त्रुटी दूर होईर्पयत भारताच्या भूमिकेत बदल होणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या 2क्11-12 च्या दौ:यातही डीआरएसचा वापर झाला नव्हता, असे कोहलीने सांगितले.
हर्षा भोगले ‘ब्रँड दूत’
आयसीसी विश्वचषक 2क्15 मध्ये भारतीय प्रेक्षकांची गर्दी खेचण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन खात्याने समालोचक हर्षा भोगले याला स्वत:चा ब्रँड दूत बनविले आहे. याशिवाय 44 दिवसांच्या स्पर्धेसाठी एअर इंडियासह अनेक एअरलाईन्सशी करार करण्यात येत आहे. स्पर्धा काळात सहा हजार भारतीय ऑस्ट्रेलियाला भेटी देतील, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलिया पर्यटनाचे क्षेत्रीय व्यवस्थापक निशांत काशीकार यांनी व्यक्त केली. भारताचा एक पर्यटक ऑस्ट्रेलियात सरासरी 435क् डॉलर इतका खर्च करतो. विश्वचषकादरम्यान या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
ह्युज संघात 13 वा खेळाडू
दिवंगत ह्युजला श्रद्धांजली अर्पण करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी राष्ट्रीय संघात 13 वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ह्युजला वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्युजच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू 4क्8 क्रमांक असलेले टी-शर्ट घालणार आहे. या व्यतिरिक्त अखेरच्या सामन्यात नाबाद 63 स्कोअर हा ह्युजला श्रद्धांजली देण्याचा एक भाग आहे. या कसोटी सामन्यासह ह्युज नेहमीसाठी 13 वा खेळाडू राहणार आहे, असे बर्नेट म्हणाले. सामना प्रारंभ होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया व भारतीय संघातील खेळाडू अॅडिलेड ओव्हल मैदानात असलेल्या 4क्8 या अंकावर उभे राहतील. यावेळी ऑस्ट्रेलियाचा रिची बॅनो ह्युजच्या स्मृतिप्रीत्यर्थ तयार करण्यात आलेला व्हिडिओ सादर करतील.
आक्रमक खेळ करू : कोहली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या, मंगळवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत आपला संघ आक्रमक खेळ करेल, असे संकेत प्रभारी कर्णधार विराट कोलही याने दिले. कसोटीत पहिल्यांदा नेतृत्व करायला मिळणो हे विशेष असल्याचेही कोहलीचे मत आहे. ‘‘माङयासाठी हा मोठा क्षण आहे. कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न मी नेहमी पाहात आलो. आता चक्क नेतृत्व करायला मिळत आहे. नाटय़मय घडामोडीत माङयाकडे नेतृत्व सोपविले जाईल, याची कल्पना नव्हती. मागच्या मालिकेतही नेतृत्व केले असल्याने सहका:यांना माङया अपेक्षा माहिती आहेत. माङयावर मुळीच दबाव नाही,’’ असे पत्रकारांशी बोलताना कोहलीने स्पष्ट केले. क्रिकेट हा सामूहिक खेळ असल्याने सर्व 11 जण कामगिरी करेर्पयत कर्णधाराचे यश नजरेत भरणो कठीण असते. माङयाशिवाय दहा अन्य खेळाडू कसे खेळतात यावर संघाचे यश अवलंबून राहील, असे तो म्हणाला. ‘आपण नेहमी जे पाहात आलात त्यापेक्षा निश्चितच वेगळे चित्र पहायला मिळेल.‘
भुवनेश्वर पहिल्या दोन लढतींना मुकण्याची शक्यता
टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार पहिल्या कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय संघाला धक्का बसला आहे. भुवनेश्वर रविवारी अॅडिलेडमध्ये सराव सत्रत सहभागी झाला नव्हता. उद्या, मंगळवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. संघ व्यवस्थापनातर्फे प्रसिद्धी पत्रकात भुवनेश्वर टाचेच्या दुखापतीतून सावरत असून, पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. वृत्तसंस्थेने मात्र ‘प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्काराचा मानकरी ठरलेला भुवनेश्वर मेलबोर्नमध्ये खेळल्या जाणा:या तिस:या कसोटी सामन्यार्पयत संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचा भुवनेश्वला कसोटी संघातून माघारी बोलविण्याचा विचार होता, पण त्यानंतर फिजिओच्या निरीक्षणाखाली त्याला ऑस्ट्रेलियातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भुवनेश्वरला मैदानात उतरविण्याची घाई करू नये, असे निर्देश संघव्यवस्थापनाला देण्यात आलेले आहे.