मिश्राचे पुनरागमन, हरभजन कायम

By Admin | Updated: July 23, 2015 23:13 IST2015-07-23T23:13:45+5:302015-07-23T23:13:45+5:30

लेग स्पिनर अमित मिश्रा याचे चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले तर अनुभवी हरभजनलादेखील श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या १५

Mishra's return, Harbhajan continued | मिश्राचे पुनरागमन, हरभजन कायम

मिश्राचे पुनरागमन, हरभजन कायम

नवी दिल्ली : लेग स्पिनर अमित मिश्रा याचे चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले तर अनुभवी हरभजनलादेखील श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या १५ सदस्यीय कसोटी संघात कायम ठेवण्यात आले आहे. ३२ वर्षांच्या मिश्राचा अपवाद वगळता याच महिन्यात बांगलादेशचा दौरा केलेल्या भारतीय संघात बदल करण्यात आला नाही.
लेगस्पिनर कर्ण शर्मा हा दुखापतग्रस्त असल्याने त्याला बाहेर ठेवण्यात आले. के. एल. राहुलने स्वत:चे स्थान कायम राखले. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर संघ जाहीर केला. बैठकीला कर्णधार विराट कोहलीदेखील उपस्थित होता. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि प्रज्ञान ओझा यांसारख्या सिनियर्सना स्थान नाकारण्यात आले, तर आॅफ फॉर्म असलेल्या रवींद्र जडेजाचादेखील निवडकर्त्यांनी विचार केला नाही.
ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि वरुण अ‍ॅरोन हे वेगवान गोलंदाज संघात आहेत. शिखर धवन व मुरली विजय हे डावाचा प्रारंभ करतील तर कर्णधार कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल हे मधल्या फळीत खेळतील. रिद्धिमान साहा हा एकमेव यष्टिरक्षक असेल.

भारतीय कसोटी संघ :
विराट कोहली कर्णधार, शिखर धवन, मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, हरभजनसिंग, आर. अश्विन, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा आणि वरुण अ‍ॅरोन.

दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली कसोटी गाले : १२ ते १६ आॅगस्ट
दुसरी कसोटी कोलंबो : २० ते २४ आॅगस्ट.
तिसरी कसोटी कोलंबो : २८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर

(वृत्तसंस्था)

Web Title: Mishra's return, Harbhajan continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.