निवृत्तीचा निर्णय फिरविणार नाही : मिस्बाह उल हक
By Admin | Updated: March 20, 2015 01:48 IST2015-03-20T01:48:30+5:302015-03-20T01:48:30+5:30
सध्याचा विश्वचषक आटोपल्यानंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा माझा निर्णय पक्का असून, कुठल्याही स्थितीत तो बदलणार नसल्याचा पुनरुच्चार पाकचा कर्णधार मिस्बाह उल हकने केला आहे.

निवृत्तीचा निर्णय फिरविणार नाही : मिस्बाह उल हक
कराची : सध्याचा विश्वचषक आटोपल्यानंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा माझा निर्णय पक्का असून, कुठल्याही स्थितीत तो बदलणार नसल्याचा पुनरुच्चार पाकचा कर्णधार मिस्बाह उल हकने केला आहे.
अॅडिलेड येथे बोलताना तो म्हणाला, ‘‘मी संघासोबत दीर्घकाळपासून खेळत आहे. निवृत्त होण्याची ही योग्य वेळ असल्याने माझा निर्णय कायम आहे. स्पर्धेत कामगिरी कशीही होवो किंवा माझी वैयक्तिक कामगिरी काहीही झाली तरी निवृत्ती निश्चित आहे.’’
पाक संघ व्यवस्थापनाने माझा उत्तराधिकारी म्हणून एखाद्या युवा खेळाडूची निवड करावी, असे मत व्यक्त करीत मिस्बाह पुढे म्हणाला, ‘‘पाक संघाला पुढे नेण्यासाठी युवा खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवायला हवा. दीर्घकाळ ही जबाबदारी कुणाकडे तरी सोपवायला हवी.’’ (वृत्तसंस्था)