मिल्खा सिंग यांनी केले रणवीर सिंगचे अभिनंदन
By Admin | Updated: August 2, 2015 23:25 IST2015-08-02T23:25:33+5:302015-08-02T23:25:33+5:30
महान धावपटू मिल्खा सिंग यांनी गोल्फर रणवीर सिंग सैनी याचे अभिनंदन केले आहे़ सैनीने लॉस एंजिल्समध्ये स्पेशल आॅलिम्पिक विश्व क्रीडा स्पर्धेमध्ये

मिल्खा सिंग यांनी केले रणवीर सिंगचे अभिनंदन
चंदीगढ : महान धावपटू मिल्खा सिंग यांनी गोल्फर रणवीर सिंग सैनी याचे अभिनंदन केले आहे़ सैनीने लॉस एंजिल्समध्ये स्पेशल आॅलिम्पिक विश्व क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनला आहे़ मिल्खा सिंग म्हणाले, ‘आटिज्म’ ने पीडित १४ वर्षीय या गोल्फरने कोट्यवधी भारतीय युवकांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे़ आत्मविश्वास आणि अथक परिश्रम, दृढ संकल्प, अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्य करता येते हे त्याने दाखवून दिले आहे़ उडन शिख या नावाने प्रसिद्ध ८४ वर्षीय मिल्खा म्हणाले, मी रणवीर आणि त्याचे कोच यांचा या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करतोय़ त्याने संपूर्ण देशाचे नाव गौरवान्वित केले आहे़(वृत्तसंस्था)