मिलिंद सोमणची एका दिवसात 67 किलोमीटरची अनवाणी धाव
By Admin | Updated: July 30, 2016 18:18 IST2016-07-30T18:18:30+5:302016-07-30T18:18:30+5:30
आरोग्य हेच धन असा संदेश देत आरोग्य जपा असा संदेश देणाऱ्या मोहीमांमध्ये रमणाऱ्या मिलिंद सोमणने अहमदाबाद मुंबई या दी ग्रेट इंडियन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे

मिलिंद सोमणची एका दिवसात 67 किलोमीटरची अनवाणी धाव
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - आरोग्य हेच धन असा संदेश देत आरोग्य जपा असा संदेश देणाऱ्या मोहीमांमध्ये रमणाऱ्या मिलिंद सोमणने अहमदाबाद मुंबई या दी ग्रेट इंडियन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे 26 जुलै रोजी मिलिंदने अहमदाबाद ते आणंद हे 67 किलोमीटरचे अंतर पार केले तेही अनवाणी पायांनी. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही 62 किलोमीटरचे अंतर त्यानं पार केलं आहे. अजून 440 किलोमीटरचा पल्ला गाठायचा असल्याचंही मिलिंदनं आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये नमूद केलं आहे.
मिलिंदने त्याच्या या उपक्रमाचा व्हिडीयो फेसबुकवर शेअर केला आहे.