मायकेल शूमाकर कोमाबाहेर स्वित्झर्लंडकडे रवाना

By Admin | Updated: June 17, 2014 04:14 IST2014-06-17T04:14:10+5:302014-06-17T04:14:10+5:30

जर्मनीचा फार्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शूमाकर हा कोमातून बाहेर आल्याची आनंदी वार्ता आहे. त्याला फ्रान्सच्या इस्पितळातून सुटी देण्यात आली

Michael Schumacher leaves for OUT outside Switzerland | मायकेल शूमाकर कोमाबाहेर स्वित्झर्लंडकडे रवाना

मायकेल शूमाकर कोमाबाहेर स्वित्झर्लंडकडे रवाना

लियॉन: जर्मनीचा फार्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शूमाकर हा कोमातून बाहेर आल्याची आनंदी वार्ता आहे. त्याला फ्रान्सच्या इस्पितळातून सुटी देण्यात आली, पण पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत स्वित्झर्लंडला पाठविण्यात आले आहे. २९ डिसेंबर २०१३ रोजी स्किर्इंग अपघातात ४५ वर्षांच्या शूमाकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो कोमात गेला होता.
त्याच्या व्यवस्थापिका सबीन केहम यांनी शूमाकरला इस्पितळातून सुटी देण्यात आली असून पुढील उपचारासाठी तो स्वित्झर्लंडच्या पुनर्वसन केंद्रात दाखल होत असल्याची घोषणा केली. लुसाने शहरात त्याच्यावर पुढील उपचार होतील, असे इस्पितयाचे प्रवक्ते डेसी ख्रिस्टीन म्हणाले. आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, थेरेपिस्ट तसेच अपघाताच्यावेळी प्रथमोपचार करणाऱ्या सर्वांचे शूमाकरने आभार मानले आहेत. त्याच्या प्रकृतीबाबत अधिक सांगण्यास सबीन यांनी नकार दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: Michael Schumacher leaves for OUT outside Switzerland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.