पेराल्टाच्या गोलने मेक्सिको विजयी !

By Admin | Updated: June 14, 2014 04:13 IST2014-06-14T04:13:04+5:302014-06-14T04:13:04+5:30

ओरिबे पेराल्टा याने रिबाऊंडवर नोंदविलेल्या गोलच्या बळावर मेक्सिकोने ‘अ’ गटाच्या सामन्यात शुक्रवारी कॅमेरुनवर १-० ने विजय नोंदवित फुटबॉल विश्वचषकात विजयी सलामी दिली

Mexico's Peralta Shoot! | पेराल्टाच्या गोलने मेक्सिको विजयी !

पेराल्टाच्या गोलने मेक्सिको विजयी !

नटाल : ओरिबे पेराल्टा याने रिबाऊंडवर नोंदविलेल्या गोलच्या बळावर मेक्सिकोने ‘अ’ गटाच्या सामन्यात शुक्रवारी कॅमेरुनवर १-० ने विजय नोंदवित फुटबॉल विश्वचषकात विजयी सलामी दिली. पेराल्टाने हा निर्णायक गोल सामन्याच्या ६१ व्या मिनिटाला केला.
हा सामना पावसात खेळला गेला तसेच गुरुवारी ब्राझील- क्रोएशिया लढतीत रेफ्रीच्या शंकास्पद निर्णयाची जी चर्चा गाजली तीच शंकास्पद निर्णयांची मालिका शुक्रवारच्या सामन्यातही कायम होती.
तत्पूर्वी, सामन्याला सुरुवात होताच खेळावर मेक्सिकोचे वर्चस्व पहायला मिळाले. सामन्याच्या ११ व्या मिनिटाला डोस सॅन्टोस मेक्सिकोला आघाडी मिळवून देईल असे वाटत होते पण रेफ्रीने त्याचा गोल आॅफ साईड ठरविला. २९ व्या मिनिटाला डोसने कॉर्नरवर संधीचा लाभ घेत हेडरद्वारे चेंडू गोलजाळीत ढकलला खरा पण यावेळी देखील रोल्डन यांनी त्याआधीच कॅमेरुनचा गोलकिपर इंताजीपुढे फाऊलचा इशारा केला होता. रेफ्रीने हे दोन्ही गोल नाकारताच मध्यांतरापर्यंतच्या खेळात उभय संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले.
ब्राझीलच्या सामन्यातही जपानचे रेफ्री युईची निशिमूरा यांनी यजमान संघाला वादग्रस्त पेनल्टी कॉर्नर बहाल केला होता. निशिमुरा हे यानिर्णयामुळे माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरले. (वृत्तसंस्था)

Web Title: Mexico's Peralta Shoot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.