मेस्सी ‘मॅजिक’ने अज्रेन्टिनाची बाद फेरीत धडक

By Admin | Updated: June 22, 2014 11:34 IST2014-06-22T00:31:37+5:302014-06-22T11:34:20+5:30

लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वात ‘जादूगर’ म्हणून का ओळखल्या जातो, याची प्रचिती चाहत्यांना शनिवारी विश्वकप फुटबॉल स्पर्धेत इराणविरुद्धच्या लढतीदरम्यान आली.

Messi 'Magic' defeats Azarenta in the next round | मेस्सी ‘मॅजिक’ने अज्रेन्टिनाची बाद फेरीत धडक

मेस्सी ‘मॅजिक’ने अज्रेन्टिनाची बाद फेरीत धडक

>बेलो होरिझोन्टो : लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वात ‘जादूगर’ म्हणून का ओळखल्या जातो, याची प्रचिती चाहत्यांना शनिवारी विश्वकप फुटबॉल स्पर्धेत इराणविरुद्धच्या लढतीदरम्यान आली. इंज्युरी टाईममध्ये मेस्सीने डाव्या पायाने नोंदविलेल्या अफलातून गोलच्या जोरावर अज्रेन्टिनाने ‘फ’ गटाच्या लढतीत इराणची झुंज 1-क् ने मोडून काढली आणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीत धडक मारली. 
आज खेळल्या गेलेली लढत जवजवळ अनिर्णीत संपणार असल्याचे चित्र होते, पण मेस्सीने डाव्या पायाने मारलेला फटका या लढतीत अफलातून गोलरक्षण करणा:या इराणचा गोलकिपर अलिरजा हकिकीला गुंगारा देत केव्हा गोलजाळ्यात विसावला हे, दस्तरखुद अलिरजालाही कळले नसावे. अखेर जादूगारने मारलेला फटका चाहत्यांना भूरळ पाडून गेला हे विशेष. दोन लढतीत 6 गुणांची कमाई करणा:या अज्रेन्टिनाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. या लढतीत अज्रेन्टिनाची भिस्त मेस्सीच्या कामगिरीवर अवलंबून होती आणि त्यानेही लौकिकाला साजेशी कामगिरी करीत संघाचा विश्वास सार्थ ठरविला. 
इराणने या लढतीत बचावात्मक पवित्र स्वीकारला होता. त्यांनी बचावासाठी सात खेळाडूंची फौज तैनात केल्यामुळे अज्रेन्टिना संघ गोल नोंदविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. मध्यंतरापूर्वी चेंडूवर अधिकवेळ इराणचे वर्चस्व होते. इराणला गोल नोंदविण्याची संधीही प्राप्त झाली होती, पण मिडफिल्डर अशकान देजागा याला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. त्यानंतर मात्र अज्रेन्टिनाने वर्चस्व गाजविले. इराणचा गोलकिपर हकिकची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मध्यंतरार्पयत गोलफलक कोराच होता. अज्रेन्टिनाला 22 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती. हिगुएनच्या पासवर स्ट्रायकर अगुएराने जोरकस फटका मारला, पण हकिकीने सूर मारत अप्रतिम बचाव केला.  मध्यंतरानंतर इराणला खाते उघडण्याची संधी होती, पण अज्रेन्टिनाच्या गोलकिपरने चमकदार कामगिरी करीत त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. (वृत्तसंस्था)

Web Title: Messi 'Magic' defeats Azarenta in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.