मेस्सी ‘हिट’, अर्जेटिना ‘टॉप’
By Admin | Updated: June 26, 2014 02:17 IST2014-06-26T02:17:33+5:302014-06-26T02:17:33+5:30
फिफा विश्वचषकात एफ गटाच्या लढतीत अर्जेटिनाने बुधवारी नायजेरियाचा 3-2 ने पराभव करीत सलग तिस:या विजयाची नोंद केली.

मेस्सी ‘हिट’, अर्जेटिना ‘टॉप’
>पोर्तो अलेग्रो : लियोनेल मेस्सी याने आपल्या पदलालित्याच्या जादुई करिष्म्याच्या बळावर दोन शानदार गोल नोंदविल्याने फिफा विश्वचषकात एफ गटाच्या लढतीत अर्जेटिनाने बुधवारी नायजेरियाचा 3-2 ने पराभव करीत सलग तिस:या विजयाची नोंद केली.
या संघाला नऊ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळाले. नायजेरिया पराभूत झाला तरीही याच गटातील दुस:या सामन्यात बोस्निया- हज्रेगोविना संघाने ईराणचा 3-1 ने पराभव केल्यामुळे नायजेरियाला बाद फेरी गाठणो शक्य झाले. नायजेरियाचे तीन सामन्यात चार गुण आहेत. बोस्निया आधीच बाहेर पडला आहे. पण त्यांनी ईराणच्या आशेवर पाणी फेरले.
गेल्या दोन्ही सामन्यात अर्जेटिनाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या मेस्सीने आज पुन्हा कमाल केली. त्याला नायजेरियाच्या अहमद मूसाकडून कडवी झुंज मिळाली. पण कर्णधार मेस्सीने सामन्यात तिस:या आणि पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये गोल नोंदविले. संघाकडून तिसरा आणि निर्णायक गोल रोजो याने 5क् व्या मिनिटाला केला. नायजेरियाकडून दोन्ही गोल मूसाने चौथ्या तसेच 47 व्या मिनिटाला नोंदविले. मेस्सी केवळ 63 मिनिटे मैदानात होता. त्यात तीन वेळा केलेल्या हल्ल्यांपैकी दोनदा गोल नोंदविण्यात तो यशस्वी ठरला.
या सामन्यात प्रेक्षक आपापल्या जागी स्थिरावलेही नसतील पण मेस्सीने तिस:याच मिनिटाला त्यांना आनंद साजरा करायला भाग पाडले. पुढच्याच मिनिटाला नायजेरियाकडून मूसाने गोल करीत बरोबरी साधून दिली. यानंतरही मेस्सीची जादू कायम राहीली. मागच्या सामन्यात अखेरच्या क्षणी गोल नोंदवून ईराणवर सरशी साधून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. (वृत्तसंस्था)
बोस्नियाने केला ईराणचा ‘गेम’
साल्वाडोर : पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का बसल्याने विश्वचषकाबाहेर पडलेल्या बोस्निया- हज्रेगोविनाने बुधवारी ‘एफ’ गटातील अखेरच्या लढतीत ईराणला 3-1 ने धूळ चारुन त्यांचा गेम केला. बाद फेरी गाठण्यासाठी ईराणने बोस्नियावर विजय नोंदविणो क्रमप्राप्त होते.पण असे घडले नाही.
मध्यांतरार्पयत 1-क् अशी आघाडी मिळविणा:या बोस्नियाने ईराणवर आणखी दोन गोल केले. 23 व्या मिनिटाला ङोकोने गोल नोंदवून ही आघाडी मिळवून दिली होती. मध्यांतरानंतर पानिकने 59 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. ईराणकडून रेजाने 82 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाचे खाते उघडले पण त्यांना सावरण्याआधी पुढच्या मिनिटाला बोस्नियाने हल्लाबोल करीत आणखी एक गोल केला. हा निर्णायक गोल साजेविकने नोंदविला.स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाल्यापासून बोस्नियाचा हा पहिलाच विश्वचषक होता.दुसरीकडे ईराण संघ विजयाचे खाते न उघडताच स्पर्धेतून बाद झाला.