मेस्सी ब्रिगेडची झुंज ऑरेंज आर्मीशी
By Admin | Updated: July 9, 2014 02:01 IST2014-07-09T02:01:17+5:302014-07-09T02:01:17+5:30
बुधवारी खेळल्या जाणा:या दुस:या उपांत्य फेरीच्या लढतीत आत्मविश्वास उंचावलेल्या नेदरलँड संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

मेस्सी ब्रिगेडची झुंज ऑरेंज आर्मीशी
फायनलचे तिकीट कोणाला? : उपांत्य फेरीत आज अर्जेटिना, नेदरलँड यांच्यात लढत
साओ पाउलो : अनेक वर्षापासून अंतिम फेरीर्पयत मजल मारण्यात अपयशी ठरल्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या लियोनेल मेस्सीच्या अर्जेटिना संघाला फिफा विश्वकप स्पर्धेत उद्या, बुधवारी खेळल्या जाणा:या दुस:या उपांत्य फेरीच्या लढतीत आत्मविश्वास उंचावलेल्या नेदरलँड संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अनेक वर्षे अंतिम फेरीपासून वंचित राहण्याचे शल्य दूर करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणा:या अर्जेटिना संघाची भिस्त लिओनेल मेस्सीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अर्जेटिना संघ यापूर्वी 199क् मध्ये अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. यावेळी अर्जेटिना संघ महान खेळाडू अलफ्रेडो डी स्टिफानो यांना विजयाने श्रद्धांजली अर्पण करण्यास प्रयत्नशील आहे. स्टिफानो यांचे वयाच्या 88 व्या वर्षी सोमवारी निधन झाले.
दुस:या बाजूचा विचार करता 1974, 1978 आणि 2क्1क् मध्ये अंतिम फेरीत पराभव स्वीकारणारा नेदरलँड संघ विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यास उत्सुक आहे. नेदरलँडचा खेळाडू डर्क कुइट म्हणाला, ‘उपांत्य फेरीची लढत महत्त्वाची आहे; पण विश्वकप गमाविल्याचे शल्य काय असते, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे आम्ही केवळ विजयासाठी खेळणार आहोत. अर्जेटिना विश्व दर्जाचा संघ असून, अंतिम चारमध्ये खेळण्याचा हकदार आहे. आम्ही जगातील सवरेत्तम संघांविरुद्ध केवळ स्वत:ला सिद्ध करण्यास प्रयत्नशील नसून, विजय मिळविण्यास उत्सुक आहोत.’
नेदरलँडला 1978 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेटिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. अर्जेटिनाने त्यावेळी 3-1 ने विजय मिळविला होता. आजतागायत उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांत अर्जेटिनाने केवळ एकदा विजय मिळविला. 1998च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अखेरच्या मिनिटाला डेनिस बर्गकेम्पने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर नेदरलँडने अर्जेटिनाचा पराभव केला होता. गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेत मेस्सीला काही कमाल करता आली नाही. त्यामुळे संघाला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. यावेळी मात्र बार्सिलोनाचा हा सुपरस्टार फॉर्मात असून, महान खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळविण्यापासून केवळ दोन विजय दूर आहे. नेदरलँडचा खेळाडू रोबेनची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. गत चॅम्पियन स्पेनला सलामी लढतीत 5-1 ने पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी देणा:या नेदरलँडने उपांत्यपूर्व फेरीत कोस्टारिकाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. शानदार व्यूहरचनेसाठी ओळखले जाणारे प्रशिक्षक लुई वान गाल यांनी कोस्टारिकाविरुद्धच्या लढतीत राखीव गोलकिपर टीम क्रूलला संधी दिली. त्याने शूटआऊटमध्ये दोनदा उत्कृष्ट बचाव केला.
मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज असलेले वान गाल यांनी आतार्पयत पाचपैकी तीन सामन्यांत बचावफळीत केवळ तीन खेळाडूंना खेळविण्याचा निर्णय घेतला. उपांत्य फेरीच्या लढतीसाठीही त्यांनी विशेष व्यूहरचना आखली असल्याचे संकेत मिळत आहेत. (वृत्तसंस्था)
नेदरलँड संघाला सेंटर बॅक रोन व्लारची उणीव भासू शकते. व्लार गुडघ्याच्या दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे.