मेस्सीने हॅट् ट्रिकसह मोडला पेलेचा ५० वर्षे जुना विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 02:05 PM2021-09-11T14:05:39+5:302021-09-11T14:06:15+5:30

दक्षिण अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासात ३४ वर्षांचा मेस्सी सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ठरला. मेस्सीच्या नावे ७९ गोल्सची नोंद झाली आहे

Messi breaks Pel's 50-year-old record with a hat-trick | मेस्सीने हॅट् ट्रिकसह मोडला पेलेचा ५० वर्षे जुना विक्रम

मेस्सीने हॅट् ट्रिकसह मोडला पेलेचा ५० वर्षे जुना विक्रम

Next
ठळक मुद्देदक्षिण अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासात ३४ वर्षांचा मेस्सी सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ठरला. मेस्सीच्या नावे ७९ गोल्सची नोंद झाली आहे

ब्यूनस आयर्स : अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सी याने विश्वचषक पात्रता फेरीत बोलेव्हियाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवीत अर्जेंटिनाला ३-० असा विजय मिळवून दिला शिवाय ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमदेखील मोडीत काढला.

दक्षिण अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासात ३४ वर्षांचा मेस्सी सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ठरला. मेस्सीच्या नावे ७९ गोल्सची नोंद झाली आहे. ७७ गोल्ससह पेले सर्वाधिक गोल्स करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. पेले यांनी अखेरचा सामना जुलै १९७१ ला खेळला होता. 
सध्या ते पोटावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे इस्पितळात आहेत.मेस्सीने सामन्याच्या १४ व्या, ६४ व्या आणि ८८ व्या मिनिटाला गोल केले. अर्जेंटिनाकडून १५३ वा सामना खेळताना मेस्सीने पहिला गोल  करीत पेले यांच्या सर्वाधिक गोल्सची बरोबरी केली. यानंतर मार्टिनेजने केलेल्या पासवर गोल करत मेस्सीने पेले यांचा रेकॉर्ड मोडत नवा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक करण्याची ही मेस्सीची ही सातवी वेळ आहे. 

n आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल्स करण्याचा रेकॉर्ड मेस्सीचा प्रतिस्पर्धी रोनाल्डोच्या नावे आहे. रोनाल्डोने १८० सामन्यांमध्ये १११ गोल केले आहेत. 

Web Title: Messi breaks Pel's 50-year-old record with a hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.