पुरुष संघ विजयी अभियान राखणार ?
By Admin | Updated: September 23, 2014 05:58 IST2014-09-23T05:58:37+5:302014-09-23T05:58:37+5:30
आशियाई स्पर्धेतील ‘ब’ गटातील सलामीच्या हॉकी सामन्यात श्रीलंकेचा ८-० ने धुव्वा उडविणारा भारतीय संघ दुसऱ्या लढतीत उद्या, मंगळवारी ओमानशी झुंजणार आहे़

पुरुष संघ विजयी अभियान राखणार ?
आशियाई स्पर्धेतील ‘ब’ गटातील सलामीच्या हॉकी सामन्यात श्रीलंकेचा ८-० ने धुव्वा उडविणारा भारतीय संघ दुसऱ्या लढतीत उद्या, मंगळवारी ओमानशी झुंजणार आहे़ पहिल्या सामन्यात लंकेला पराभूत केल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे़ या बळावर संघ दुसऱ्या लढतीतही विजयी मिळविण्यासाठी उत्सुक आहे़ ओमानविरुद्धच्या लढतीनंतर भारतीय संघ २५ सप्टेंबरला पाकिस्तानशी भिडणार आहे़ २७ सप्टेंबरला भारताचा सामना चीनशी होणार आहे़ भारताने श्रीलंकेविरुद्ध सहज विजय मिळविला; मात्र सरदार सिंहच्या नेतृत्वाखालील संघ या सामन्यात विशेष प्रभाव पाडू शकला नव्हता़ कारण भारताने या लढतीत गोल करण्याच्या अनेक संधी गमाविल्या होत्या़ आता ओमानविरुद्ध भारतीय संघ आणखी मोठा विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल़
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक करणारा रुपिंदरपाल सिंह ओमानविरुद्ध आणखी गोल आपल्या नावे करण्यासाठी प्रयत्नशील असेल़ तसेच गत लढतीत दोन गोल करणारा रमणदीप सिंह फॉरवर्ड लाईनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहे़