हॉकीच्या मैदानातील आशियातील हिरो कोण? याचा फैसला करण्यासाठी बिहार सज्ज झालं आहे. हॉकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच बिहार येथील राजगीर क्रीडा संकुलात हॉकीतील हिरो आशिया कप स्पर्धा रंगणार आहे. २९ ऑगस्टर ते ७ सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाटील पुत्र स्पोर्ट्स कॉम्पलेक्समध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय हॉकी संघाच्या कर्णधार अन् प्रशिक्षकांसह या अधिकाऱ्यांनी लावली होती हजेरी
यावेळी क्रीडा विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. बी राजेंद्र,बिहार राज्य खेल प्राधिकरणाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्रन शंकरण यांच्यासह हिरो आशिया कपसाठी पटनात पोहचलेला भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला की, "राजगीरच्या जागतिक दर्जाच्या टर्फवर खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाकडून कडवी टक्कर मिळेल, पण विजयासाठी आमचा संघ सज्ज आहे.”
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
बिहार क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण; इथं पहिल्यांदाच रंगणार आशिया कप स्पर्धा
हिरो आशिया कप २०२५ स्पर्धेसंदर्भात बिहार राज्य क्रीडा प्राधिकरणाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रन शंकरन म्हणाले की, बिहारमधील राजगीर येथील आंतरराष्ट्रीय मैदानात पहिल्यांदाच हॉकीची मोठी स्पर्धा पार पडणार आहे. २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येईल. आंतरारष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेच्या १२ व्या हंगामासाठी सर्वजण उत्सुक आहोत. भारतीय हॉकी संघासह, चीन, जपान, चीनी ताइपे, मलेशिया,कोरिया,कजाखिस्तान आणि बांगलादेश हे संघ मैदानात उतरतील.
हॉकीत आशिया कप स्पर्धेत कुणाचा राहिलाय दबदबा?
गत विजेत्या दक्षिण कोरिया संघाने या स्पर्धेत (१९९४, १९९९, २००९, २०१३ आणि २०२२) सर्वाधिक पाच वेळा जेतेपद मिळवले आहे. त्यापाठोपाठ भारतीय हॉकी संघासह (२००३,२००७ आणि २०१७) आणि पाकिस्तान हॉकी संघ (१९९२, १९८५ आणि १९८९) प्रत्येकी ३-३ वेळा ही स्पर्धा जिंकून संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे.
तिकीट मोफत मिळणार, पण... हिरो आशिया कप स्पर्धेतील सामने स्टेडियमवर हजेरी लावून सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना विन तिकीट प्रवेश दिला जाणार आहे. पण कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून स्टेडियमवर हजेरी लावण्यासाठी ticketgenie app च्या माध्यमातून तिकीट बूक करावे लागणार आहे. २६ ऑगस्टपासून क्रीडा प्रेमींना आपले तिकीट बूक करता येईल.
राष्ट्रीय क्रीडा दिवस बिहारसाठी ठरणार अविस्मरणीय
२९ ऑगस्ट हा दिवस भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खास आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी बिहारच्या मैदानात इतिहास रचला जाईल. कारण याच दिवशी हॉकीतील आशिया कप स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.
कसा असेल हिरो कप आशिया कप स्पर्धेसाठीचा खास कार्यक्रम
भव्य उद्घाटन सोहळा
२९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन. याच दिवशी या स्पर्धेचा शुभारंभ होणार
विशेष कार्यक्रम
- ३० ऑगस्ट 'हॉकी विथ हरमनप्रीत” : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार युवा तरुणांना देणार हॉकीचे धडे
- ३१ ऑगस्ट “संडे ऑन सायकल” : आरोग्य व पर्यावरण जागरूकतेसाठी भारतीय संघातील खेळाडू स्थानिक तरुणांसह ५ किमी सायकल रॅलीत भाग घेणार
- १७ ऑगस्टपासून सुरू झालेली ट्रॉफी गौरव यात्रा बिहारसह झारखंड, ओडिशा, चंदीगड, दिल्ली आणि आसाममध्ये पोहोचली असून २९ ऑगस्टला राजगीर येथे या ट्रॉफी यात्रेचा समारोप होईल.