मेलबर्न कसोटी- दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५ बाद २५९
By Admin | Updated: December 26, 2014 12:30 IST2014-12-26T08:49:36+5:302014-12-26T12:30:59+5:30
कर्णधार स्मिथच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीमुळे तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला असून दिवअखेर ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावत २५९ धावा केल्या.

मेलबर्न कसोटी- दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५ बाद २५९
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २६ - कर्णधार स्मिथच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीमुळे तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला असून दिवअखेर ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावत २५९ धावा केल्या. भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवून २ - ० अशी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने तिस-या कसोटीत टॉस जिंकून फलंदाजी घेतली. वॉर्नर शून्यावर बाद झाल्यावर रॉजर्स (५७) आणि वॉटसन (५२) यांनी अर्धशतके झळकावत त्यांचा डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र तेही पटापट तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार स्मिथने (नाबाद ७२) मार्श (३२) व बर्न्सच्या (१३) साथीने ऑस्ट्रेलियाला २००चा टप्पा पार करून दिला. दिवअखेर स्मिथ व हॅडिन (२३) खेळत आहेत. भारतातर्फे शमीव यादवने २ तर अश्विनने १ बळी टिपला.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासमोर तिसरी कसोटी जिंकण्याचे व मालिका वाचवण्याचे आव्हान आहे.