मॅक्युलमने निर्मिले कर्णधाराचे नवे मापदंड

By Admin | Updated: May 6, 2015 02:48 IST2015-05-06T02:48:30+5:302015-05-06T02:48:30+5:30

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम याने आपल्या आक्रमक शैलीने कर्णधारपदाचे नवीन मापदंड तयार केले असून इतर सर्वजण त्याचे अनुकरण करीत आहेत, असे मत जलदगती गोलंदाज टीम साउथी याने व्यक्त केले आहे.

McLuill's new captain's regulation | मॅक्युलमने निर्मिले कर्णधाराचे नवे मापदंड

मॅक्युलमने निर्मिले कर्णधाराचे नवे मापदंड

टीम साउथी : इतर सर्व कर्णधारांकडून अनुकरण

मुंबई : न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम याने आपल्या आक्रमक शैलीने कर्णधारपदाचे नवीन मापदंड तयार केले असून इतर सर्वजण त्याचे अनुकरण करीत आहेत, असे मत जलदगती गोलंदाज टीम साउथी याने व्यक्त केले आहे.
पीटीआयशी बोलताना २६ वर्षीय साउथी म्हणाला, आज न्यूझीलंड संघ ज्या ठिकाणी पोहचला आहे, त्याचे श्रेय मॅक्युलमचे आक्रमक नेतृत्त्व, सकारात्मक देहबोली आणि खेळाडूंना समजून घेणे याला जाते. त्याची विचारशक्ती अचाट आहे, त्याच्या जोरावरच तो संघाला या दर्जापर्यंत घेऊन आला आहे. त्याने संघाला पूर्णपणे बदलले आहे. त्याच्या शैलीचे अनुकरण इतर संघ करीत आहेत.
विश्वचषक स्पर्धेत डावखुऱ्या ट्रेंट बोल्ट सोबत साउथीची चांगली जोडी जमली होती. बोल्ट आणि आॅस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क याने स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले होते. साउथी म्हणाला, न्यूझीलंड संघातील गोलंदाजीचे चित्र सध्या सुखावह आहे.

> आक्रमक नेतृत्व
मॅक्युलमचे आक्रमक नेतृत्त्व, सकारात्मक देहबोली आणि खेळाडूंना समजून घेणे याला जाते. त्याची विचारशक्ती अचाट आहे, त्याच्या जोरावरच तो संघाला या दर्जापर्यंत घेऊन आला आहे. त्याने संघाला पूर्णपणे बदलले आहे. ज्यामुळे न्यूझीलंड संघाला विश्वचषकात चांगली कामगिरी करता असल्याचे साउथी म्हणाला.

Web Title: McLuill's new captain's regulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.