पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लटकलं ऑलिम्पिक पदकविजेत्या मेरी कोमचं ड्रीम प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 05:21 PM2018-02-05T17:21:39+5:302018-02-05T17:25:05+5:30

भारताची पाचवेळची जगज्जेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्‍ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं लटकला आहे.

mc-mary-kom-boxing-academy-completed-around-two-years-back-but-waiting-for-prime-minister-narendra-modi-to-formally-inaugurate | पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लटकलं ऑलिम्पिक पदकविजेत्या मेरी कोमचं ड्रीम प्रोजेक्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लटकलं ऑलिम्पिक पदकविजेत्या मेरी कोमचं ड्रीम प्रोजेक्ट

Next

नवी दिल्ली - भारताची पाचवेळची जगज्जेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्‍ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं लटकला आहे. मेरी कोमनं मणिपूरची राजधाळी इंफाळपासून 10 किलोमिटर दूर लांगोल हिस्ल येथे एक बॉक्सिंग अकादमी तयार केली आहे. ही अकादमी दोन वर्षापूर्वी तयार झाली आहे. पण औपचारिक उद्धाघाटनासाठी अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत आहे. यासाठी मेरी कोमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणा केली होती. पण त्याचे अजून उत्तर मिळालेले नाही. त्यामुळं मेरी कोमचा ड्रीम प्रोजेक्ट तयार होऊनही सर्वांसाठी खुला झालेला नाही. 

दरम्यान, मेरी कोम आपल्या अकादमीच्या विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. तीन एकर क्षेत्रामध्ये तयार झालेल्या या अकादमीत सध्या 25 तरुण आणि 20 महिला बॉक्सिंगचे धडे घेत आहेत. तीन मजली इमारतीमध्ये बॉक्सिंगसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.  
मेरी कोमचे पती आणि अकादमीचे मुख्य  ओनलर कारोंग म्हणाले की, मेरी बॉक्सिंगला ती काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करतेय. तिला ज्या अडचणीचा सामना करावा लागला तो इतरानां लागू नये. हा तिचा उद्देश आहे. या अकादमीतून अनेक युवा-युवतीला बॉक्सिंगचे धडे मिळतील. या अकादमीची निर्मीती म्हणजे मेरी कोमचे स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. मणिपूर आणि देशातील अन्य भागात ती अशाच प्रकारच्या अकादमी उघडण्याचे स्वप्न पाहत आहे. 

अधुनिक साहित्या आणि सुविधा असलेली ही भारताची पहिलीच अकादमी असल्याचे मत मेरी कोमच्या पतीनं व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले की, ही अकादमी तयार होवून दोन वर्ष झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन करावं असे आम्हाला वाटते. अकादमीमध्ये भारतीय क्रिडा प्राधिकरण (साई)ते अक्सटेंशन सेंटर आहे. मेरी कोम क्षेत्रीय बॉक्सिंगचा हा एक भाग आहे. 

ओनलर पुढे म्हणाले की, क्रिडा सचिवानं अकादमीला भेट दिली आहे. त्याचप्रमाणे याबाबत पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यासोबत तीन वेळ भेटही झाली आहे. यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आलं होत की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धाटनाला येतील. आम्हाला आशा आहे की, यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉक्सिंग अकादमीचं उद्घाघाटन करतील. 

Web Title: mc-mary-kom-boxing-academy-completed-around-two-years-back-but-waiting-for-prime-minister-narendra-modi-to-formally-inaugurate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.