महापौर चषक कबड्डी स्पर्धा

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:01+5:302015-02-18T23:54:01+5:30

महापौर चषक अ.भा.खो-खो स्पर्धेचे आयोजन

Mayor Trophy Kabaddi Tournament | महापौर चषक कबड्डी स्पर्धा

महापौर चषक कबड्डी स्पर्धा

ापौर चषक अ.भा.खो-खो स्पर्धेचे आयोजन
नागपूर : महापौर चषक अ.भा. खो-खो स्पर्धेचे आयोजन उद्या दि.१९ पासून चिटणीस पार्कवर होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुष गटात १७ तसेच महिला गटात १२ संघ साखळी तसेच बाद फेरीत जेतेपदासाठी झुंज देतील, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक सुधीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर महानगरपालिकेने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे आयोजन केले आहे. दोन्ही गटातील विजेत्या संघांना एक लाख रोख, उपविजेत्या संघांना प्रत्येकी ७५ हजार रोख तसेच तिसरे आणि चौथे स्थान पटकविणाऱ्या संघांना प्रत्येकी ३० आणि ३० हजार रोख असे पुरस्कार दिले जातील. स्पर्धेत सवार्ेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा पुरस्कार मिळेल.
स्पर्धेसाठी तीन क्रीडांगणे सुसज्ज करण्यात आली असून सकाळ तसेच सायंकालीन सत्रात सामने होतील. केंद्रीय रस्ते विकास आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे दुपारी ४ वाजता स्पर्धेच उद्घाटन करतील. २२ ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mayor Trophy Kabaddi Tournament