आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार मायलेक जोडी

By Admin | Updated: May 4, 2016 21:16 IST2016-05-04T21:16:15+5:302016-05-04T21:16:15+5:30

आॅलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच निनो सालुक्वाद्झे - त्सोत्ने मचाववरीआनी ही मायलेकाची जोडी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार

Maylake pair to participate in the Olympics | आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार मायलेक जोडी

आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार मायलेक जोडी

ऑनलाइन लोकमत
त्बिलिसी, दि. 4- आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत जॉर्जियाच्या नावावर किती पदकं येणार हे येणाऱ्या आॅगस्ट महिन्यात कळेलंच. मात्र यंदाच्या ओलिम्पिकमध्ये जॉर्जियाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला जाणार हे निश्चित आहे. आॅलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच निनो सालुक्वाद्झे - त्सोत्ने मचाववरीआनी ही मायलेकाची जोडी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार असून नेमबाजीमध्ये जॉर्जियाच्या नावावर हा विक्रम नोंदवला जाणार आहे.
आजपर्यंत आॅलिम्पिकमध्ये अनेक परिवाराने आपली चमक दाखवली. एका परिवारातील एका पिढीतून दुसऱ्या पिढीने आॅलिम्पिक गाजवल्याचे अनेक उदाहरणे दिसून येतील. मात्र पहिल्यांदाच एकाच आॅलिम्पिक स्पर्धेत मायलेक जोडी सहभागी होण्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे निनो या तब्बल आठव्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असन त्यांना आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे. मात्र यंदाची आॅलिम्पिकम त्यांच्यासाठी विशेष असून आपला १८ वर्षीय मुलगा त्सोत्नेसह नेमबाजीमध्ये सहभागी होणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये त्सोत्ने याने आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तुलमध्ये आॅलिम्पिक कोटा मिळवला. आॅलिम्पिक इतिहासतज्ज्ञ बिल मॅल्लोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पिता-पित्राच्या ५६ जोडींनी एकाच आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेतला असून, पिता-पुत्रीच्या १२ जोडींनी एकाच आॅलिम्पिकमध्ये आपले कौशल्य सादर केले आहे. त्याचप्रमाणे मायलेकींच्या २ जोडींनीही आॅलिम्पिकमध्ये आपली चमक दाखवली आहे. मात्र पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये मायलेकाची जोडी सहभागी होत असल्याने निनो व त्सोत्ने यांच्या कामगिरीवर साऱ्या विश्वाचे लक्ष असेल.

जॉर्जियन शूटींग फेडरेशनची प्रतिनिधी म्हणून मला अत्यंत आनंद आहे. पण त्याहून अधिक देशाकडून खेळणाऱ्या मुलाची आई म्हणून अधिक आनंद आहे.
- निनो सालुक्वाद्झे
.

Web Title: Maylake pair to participate in the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.