मथिआस कुटिन्होचा निर्णायक गोल

By Admin | Updated: February 25, 2017 04:02 IST2017-02-25T04:02:53+5:302017-02-25T04:02:53+5:30

मथिआस कुटिन्हो याने झळकावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर मोगावीरा एससी संघाने २१व्या रामनाथ पय्याडे स्मृती फुटबॉल स्पर्धेत विजयी कूच करताना बॉम्बे फोर्ट एससीचा १-० असा पराभव केला.

Matthias Kutinho's final goal | मथिआस कुटिन्होचा निर्णायक गोल

मथिआस कुटिन्होचा निर्णायक गोल

मुंबई : मथिआस कुटिन्हो याने झळकावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर मोगावीरा एससी संघाने २१व्या रामनाथ पय्याडे स्मृती फुटबॉल स्पर्धेत विजयी कूच करताना बॉम्बे फोर्ट एससीचा १-० असा पराभव केला. क्रॉस मैदानावर झालेल्या या सामन्यात मोगावीरा संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना बॉम्बे संघाला पुनरागमनाची संधी दिली नाही.
दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात करताना सामन्याची रंगत वाढवली. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने गोल करण्याची संधी निर्माण झाल्याने फुटबॉलप्रेमींमध्येही उत्साह दिसून आला. मोगावीरा आणि बॉम्बे संघाच्या दमदार संरक्षणामुळे स्ट्रायकर खेळाडूंची मोठी कसोटी लागली. मध्यांतराला सामना गोलशून्य बरोबरीत होता.
विश्रांतीनंतर मात्र मोगावीराने काहीसा वेगवान खेळ करत सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, बॉम्बे संघाने जबरदस्त संरक्षण करताना मोगावीराचे आक्रमण परतावून लावले. बॉम्बे संघाच्या मजबूत बचावापुढे मोगावीराचे आक्रमक अपयशी ठरत होते. परंतु, सामना अनिर्णीत सुटणार असे दिसत असतानाच मथिआसने अंतिम काही मिनिटांमध्ये जोरदार मुसंडी मारून निर्णायक गोल करताना मोगावीरा संघाला शानदार विजय मिळवून दिला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Matthias Kutinho's final goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.