पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द
By Admin | Updated: October 8, 2015 22:48 IST2015-10-08T20:28:19+5:302015-10-08T22:48:29+5:30
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी - २० सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. टी-२० मालिकेतील पहिले दोन सामन्यावर

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ८ - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी - २० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यावर द. आफ्रिकेने विजय मिळविल्याने आता या मालिकेवर द. आफ्रिकेने २-० अशा शिक्कामोर्तब करत मालिका काबीज केली आहे.
आजचा कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर टी२० सामना सुरु होण्यापुर्वी जोरदार पाऊस आल्यामुळे मैदानावर पाणी साचले यामुऴे पंचानी मैदानाची पाहणी करुन खेऴ काहीकाळ उशिराने सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र मैदानाची आऊटफिल्ड खरब असल्यामुळे अखेर सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मालिकेतील दोन्ही सामने हरल्यामुळे धोनी अँड कंपनीसाठी आजची लढाई प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र त्यावर पावसाचे पाणी फिरले.
टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात सहा गड्यांनी विजय नोंदवित आफ्रिकेने मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली होती. भारत या सामन्यात निचांकी ९२ धावांत गारद झाला. शिवाय, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना दोनदा थांबविण्यात आला होता.
जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यात भारताला अशाच प्रकारच्या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अखेरचे दोन सामने गमावताच भारताने यजमानांना मालिका १-२ ने गमावली होती.