शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

बर्लिनमध्ये आपल्या देशाचा गौरव! भारताच्या 'सोनेरी' शिलेदारांना सचिन तेंडुलकरचा कडक सॅल्युट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 12:52 IST

  World Archery Championship 2023 : बर्लिन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी सोनेरी कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली.

बर्लिन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी सोनेरी कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकून भारतीय तिरंदाजांनी जर्मनीच्या धरतीवर भारताचा गौरव केला. खरं तर शुक्रवारी ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला. तर, शनिवारी अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने  अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले. 

दरम्यान, भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी केली असल्याचे सचिनने म्हटले. तसेच महिला कम्पाऊंड संघातील खेळाडू (ज्योती, अदिती आणि परनीत) यांनी सांघिक कामगिरी करून सुवर्ण पदक जिंकले. पुरूष वैयक्तिकमध्ये ओजस देवतळेने सोनेरी कामगिरी केली. याशिवाय महिला वैयक्तिकमध्ये अदिती आणि ज्योती यांनी पदकांना गवसणी घातली. भारताच्या महिला त्रिकूटाने फायनल जिंकली, त्यानंतर अदितीने १७ व्या वर्षी वैयक्तिक विश्वविजेतेपद पटकावले आणि त्यानंतर ओजसने अचूक स्कोअर करून इतिहास रचला. बर्लिनमध्ये आमच्या तिरंदाजांनी भारताचा गौरव केला, अशा शब्दांत क्रिकेटच्या देवाने खेळाडूंच्या कामगिरीवर कौतुकाची थाप दिली. 

अदिती स्वामीची ऐतिहासिक कामगिरीमूळची सातारची असलेल्या मराठमोळ्या अदिती स्वामीने वैयक्तिक सुवर्ण जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. लक्षणीय बाब म्हणजे १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने शनिवारी जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले. 

ओजस देवतळेचा 'सुवर्ण' वेधजागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ओजस देवतळेने देखील सोनेरी कामगिरी करत सुवर्ण पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे ओजस देवतळे हा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. अंतिम फेरीत त्याने १५० गुण मिळवून सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला. 

त्रिकूटाचा सोन्यावर निशाणाशुक्रवारी भारताच्या महिला खेळाडूंनी सांघिक अंतिम फेरीत देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरIndiaभारतGold medalसुवर्ण पदकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी