शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

मेरी कोमने बॉक्सिंग पर्यवेक्षकपद सोडले, क्रीडामंत्र्यांच्या सूचनेचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:21 AM

पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि आशियाई विजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिने बॉक्सिंगमधील राष्ट्रीय पर्यवेक्षक पदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्ली : पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि आशियाई विजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिने बॉक्सिंगमधील राष्टÑीय पर्यवेक्षक पदाचा राजीनामा दिला. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सक्रिय खेळाडू पर्यवेक्षक राहू शकणारनाही, असे स्पष्ट करताच मेरीने पद सोडले.मागच्या महिन्यात पाचव्यांदा आशियाई सुवर्ण विजेती बनलेली मेरी म्हणाली,‘मी दहा दिवसांआधी क्रीडामंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर पद सोडले. मी हे पद मागितले नव्हते तर या पदावर काम करण्याची आॅफर मिळाली होती. सक्रिय खेळाडूला राष्टÑीय पर्यवेक्षक बनविण्याचा काही नियम आहे का, अशी विचारणा मी त्यावेळी तत्कालीन क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांच्याकडे केली होती. त्यावेळी पद स्वीकार कर, असे मला सांगण्यात आले. मी क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीवरून हे पद स्वीकारले होते. पद मागितलेच नव्हते त्यामुळे कुठल्या वादात पडू इच्छित नाही.’ तत्कालीन क्रीडामंत्री विजय गोयल यांनी मार्च महिन्यात १२ राष्टÑीय पर्यवेक्षक नेमले होते. त्यात मेरी कोमचा समावेश करण्यात आला. याच यादीत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, आॅलिम्पिकची दोन पदके विजेता मल्ल सुशील कुमार आणि बॉक्सर अखिल कुमार यांचा समावेश होता. सुशील आणि मेरी कोम हे सक्रिय खेळाडू असून अखिल मात्र बॉक्सिंगमध्ये सक्रिय नाही. मेरी कोम पुढे म्हणाली, ‘पर्यवेक्षकपद भूषविण्यात मला कधीही रुची नव्हती. मंत्रालयाच्या आग्रहावरून मी हे पद स्वीकारले. माझ्याकडे अनेक कामे आहेत. मला हे पद गमविल्याची मुळीच खंत नाही.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :Mary Komमेरी कोमIndiaभारत