शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

बॉक्सर मेरी कोमचा घटस्फोट होणार? तीन वर्षांपासून नात्यात दुरावा, पती-पत्नीचे वेगवेगळे बिऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:27 IST

Mary Kom Divorce: मेरी कोम एका बिझनेसमनला डेट करत असल्याचीही रंगलीये चर्चा

Mary Kom Divorce: भारताची पदकविजेती बॉक्सर एमसी मेरी कोम आणि तिचा पती करुंग ओन्खोलर (ऑनलर) यांच्या नात्यातील अंतर वाढल्याचे बोलले जात आहे. ते दोघे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. मेरी कोम हे बॉक्सिंगच्या जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून तिचे नाव आदराने घेतले जाते. २० वर्षांपूर्वी मेरी कोमने लग्न केले होते, पण आता दोघे विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत. दोघांनी अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केलेली नाही, परंतु चर्चा मात्र रंगली आहे.

२०२२ पासून नात्यात दुरावा

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, २०२२च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत ओनलरच्या पराभवानंतर दोघांमधील नात्यात दुराव्याला सुरूवात झाली. या काळात कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अहवालानुसार, बॉक्सर आणि तिची चार मुले फरिदाबादमध्ये राहतात, तर तिचा पती काही कुटुंबातील सदस्यांसह दिल्लीत राहतो.

मेरी कोम दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये?

मेरी कोम आणि ऑन्लरच्या विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान एक वेगळी चर्चाही सुरू आहे. मेरी कोम ही एका बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेरी कोम तिच्या पतीपासून वेगळी राहायला लागनंतर तिच्या आयुष्यात एक बिझनेसमन आला आणि हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

कोण आहे तो बिझनेसमन?

मेरी कोमचे बिझनेस पार्टनर आणि मेरी कोम फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश चौधरी यांच्यासोबत तिचे नाव घेतले आहे. त्यांचे मेरी कोमशी थेट नाव जोडलेले नाही, पण हितेश चौधरी हे एका ऑलिंपिक विजेत्या बॉक्सरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यात त्यांनी मेरी कोमसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे या चर्चांनी आणखी खतपाणी मिळाले आहे.

टॅग्स :Mary Komमेरी कोमDivorceघटस्फोटboxingबॉक्सिंग