मारिया शारापोव्हा, जोकोवीच तिसऱ्या फेरीत

By Admin | Updated: July 2, 2015 03:18 IST2015-07-02T03:18:07+5:302015-07-02T03:18:07+5:30

गतविजेता नोवाक जोकोवीच व माजी विजेती मारिया शारापोव्हा आणि एम रॉनिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करतील विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Maria Sharapova, Djokovic in third round | मारिया शारापोव्हा, जोकोवीच तिसऱ्या फेरीत

मारिया शारापोव्हा, जोकोवीच तिसऱ्या फेरीत

लंडन : गतविजेता नोवाक जोकोवीच व माजी विजेती मारिया शारापोव्हा आणि एम रॉनिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करतील विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोेविचने फिनलंडच्या जार्को निमिनेन याला सरळ सेटमध्ये पराभूत करत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोवीचने नेमिनेन याला ६-४, ६-२, ६-३ असे पराभूत केले.
महिलांच्या एकेरीमध्ये चौथ्या मानांकित शारापोव्हाने नेदरलॅँडच्या रिचेल होगेनकॅँपला ६-३, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. शारापोव्हाला तिसऱ्या फेरीत उक्रेनची लेसिया सुरेनको व रोमानियाची इरीना कामेलिया बेगुुु यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याशी लढावे लागणार आहे. दुसरीकडे पुरुष एकेरीत कॅनडाच्या एम. रॉनिकने जर्मनीच्या टॉमी हॅसला चुरशीच्या झालेल्या लढतीत ६-०, ६-२, ६-७ (५-७), ७-६ (७-४) असे नमविले.
महिला गटात गतउपविजेत्या युजिनी बुकार्ड आणि गतस्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेल्या सिमोना हालेप यांना मात्र धक्कादायकरीत्या हार पत्करावी लागली. फ्रान्सच्या जेरेमी चार्डी विरुद्ध झालेल्या या सामन्यात बेर्दिजने झुंजार खेळ केला. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक सेट जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना बेर्दिजने ६-२, ६-७, ७-६, ७-६ असा झुंजार विजय मिळवून विजयी सलामी दिली. गतवर्षी अंतिम फेरीत धडक मारून सर्वांना चकीत करणाऱ्या युवा बुकार्डचे आव्हान यंदा पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. १२व्या मानांकित कॅनडाच्या बुकार्डाला चीनच्या की यिग डुयान विरुद्ध ६-७, ४-६ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला तृतीय मानांकित हालेपला चांगल्या सुरुवातीनंतरही पहिल्याच सामन्यात स्पर्धेबाहेर व्हावे लागले. स्लोवाकियाच्या याना सेपेलोवा विरुद्ध पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर हालेपला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. सेपेलोवाने सलग दोन सेटमध्ये बाजी मारताना कसलेल्या हालेपला ५-७, ६-४, ६-३ असा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)

पेस विजयी
भारताचा दिग्गज व अनुभवी खेळाडू लिएंडर पेस याने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरच्या सोबतीने खेळताना विम्बल्डन पुरुष दुहेरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पेस-नेस्टर या ११व्या मानांकित जोडीने सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोयकी - दुसान लाजोव्हिक या जोडीचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ७-५ असा धुव्वा उडवला.
दरम्यान, पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस गमावलेल्या पेस - नेस्टर जोडीने पुढच्याच गेममध्ये सर्बियन जोडीची सर्व्हिस ब्रेक करताना दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या बाजूला भारताच्या पुरव राजा आणि फ्रान्सच्या फॅब्रीस मार्टिन या जोडीला माजी विजेत्या जोनाथन मरे-फ्रेड्रिक नील्सन या जोडीविरुद्ध १-६, ४-६, ६-४, ६-७(७-९) असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला.

Web Title: Maria Sharapova, Djokovic in third round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.