मराठी कलाकार करणार क्रिकेट कल्ला
By Admin | Updated: May 4, 2015 00:50 IST2015-05-04T00:50:38+5:302015-05-04T00:50:38+5:30
रंगमंच व छोट्या-मोठ्या पडद्याच्या माध्यमातून कलामंचाच्या पिचवर षटकार-चौकार वसुल करणारे कलाकार आता क्रिकेटचे मैदान गाजविताना दिसणार आहेत

मराठी कलाकार करणार क्रिकेट कल्ला
पुणे : रंगमंच व छोट्या-मोठ्या पडद्याच्या माध्यमातून कलामंचाच्या पिचवर षटकार-चौकार वसुल करणारे कलाकार आता क्रिकेटचे मैदान गाजविताना दिसणार आहेत. मराठी बॉक्स आॅफिस क्रिकेट लीगच्या माध्यमातून कालाकारांचा हा क्रिकेट कल्ला जमून आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची अनोखी क्रिकेट स्पर्धा येत्या ८ ते १० मे दरम्यान पाचगणी येथे होत आहे. महाराष्ट्र कलाधिनीच्या वतीने ही स्पर्धा सुरु करण्यात येत आहे. यात लोकमत व सारथी एंटरटेन्मेंटची मस्त पुणे ही टीम देखिल सहभागी होत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)