विराटच्या तंत्रात अनेक त्रुटी : गावस्कर
By Admin | Updated: November 25, 2015 23:42 IST2015-11-25T23:42:50+5:302015-11-25T23:42:50+5:30
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजी तंत्रात अनेक त्रुटी असल्याचे मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

विराटच्या तंत्रात अनेक त्रुटी : गावस्कर
नागपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजी तंत्रात अनेक त्रुटी असल्याचे मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या द. आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विराट ५५ चेंडूत दोन चौकारांसह २२ धावा काढून वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्केलच्या चेंडूवर यष्टीमागे डेन विलासकडे झेल देत बाद झाला.
विराटच्या फलंदाजीतील दोषांबद्दल एका वृत्त वाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले, ‘या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याची विराटची पद्धत चुकली. त्याचा पाय यष्टीच्या फारच बाहेर असतो. शिवाय संतुलन नाही. त्याला स्टान्स लहान करण्याची गरज आहे. यामुळे तो क्रिझचा वापर योग्यरीत्या करू शकेल. असे झाल्यास विराटला चेंडू समजून घेण्याची कला अवगत होईल आणि कोणता चेंडू सोडायचा व कोणता खेळायचा याचा वेध घेता येईल.’
विराटने गेल्या दहा डावांत लंकेविरुद्ध कसोटीत आॅगस्टमध्ये १०३ धावांची खेळी केली होती. भारताच्या नंबर वन फलंदाजाचे रिपोर्ट कार्ड आणखी चांगले असायला हवे.’