शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

मनू भाकरने 'दुखावलेल्या' नीरज चोप्रासाठी लिहिला खास भावनिक संदेश, ट्विट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 16:42 IST

Manu Bhaker Neeraj Chopra: नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. त्यानंतर त्याने आपल्या हाताला झालेल्या दुखापतीची माहिती दिली. त्यावर ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरने त्याच्यासाठी एक विशेष ट्विट केले. वाचा काय आहे मजकूर.

Manu Bhaker Neeraj Chopra: भारताचा 'गोल्डन बॉय' अशी ओळख असणारा नीरज चोप्रा याला यंदाच्या हंगामात अद्याप तरी सुवर्णवेध घेता आलेला नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीममुळे सुवर्णपदकाने नीरजला हुलकावणी दिली. त्यावेळी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण डायमंड लीग ( Diamond League 2024 ) स्पर्धेत नीरज नक्कीच सुवर्णकमाई करेल अशी आशा भारतीयांना होती. पण ती आशाही पूर्ण झाली नाही. नीरजला डायमंड लीग मध्ये केवळ एका सेंटीमीटरच्या फरकाने सुवर्णपदक गमवावे लागले. त्यानंतर नीरजने आपल्या दुखापतीची माहिती दिली. त्यावर पॅरिस ऑलिम्पिकमधील दुहेरी पदक विजेती नेमबाज मनू भाकर हिने नीरजसाठी खास संदेश दिला.

डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.६१ मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. नीरज चोप्राने देखील ऑलिम्पिकमध्ये सेट केलेला स्वत:चा विक्रम मागे टाकला. पण नीरज चोप्राचा बेस्ट थ्रो ८९.४५ मीटर इतकाच गेला. पण विशेष म्हणजे दुखापतीने त्रस्त असतानाही त्याने कामगिरी करुन दाखवली. त्यानंतर मनू भाकरने त्याला खास संदेश दिला. "नीरज चोप्रा, नुकत्याच संपलेल्या २०२४च्या हंगामातील तुझ्या उत्तम कामगिरीबाबत तुझे मन:पूर्वक अभिनंदन. तुझी दुखापत लवकर बरी होवो. तू लवकर तंदुरूस्त हो. आगामी काळात तुला आणखी यश मिळू दे," असे ट्विट मनू भाकरने केले.

डायमंड लीग स्पर्धेतील नीरजची कामगिरी

डायमंड लीग स्पर्धेतील अखेरचा थ्रो नीरजने लांब अंतरावर फेकत एक नवा विक्रम सेट केला. पहिल्या प्रयत्नात नीरजने ८२.१० मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत ८३.२१ मीटर अंतरावर भाला फेकला. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ८३.१३ आणि ८२.३४ अंतरावर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात ८५.५८ मीटर भाला फेकल्यानंतर शेवटच्या प्रयत्नात मात्र त्याने ८९.४९ मीटरसह बेस्ट थ्रोची नोंद केली. या थ्रो ने त्याला रौप्यपदक मिळवून दिले.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Pakistanपाकिस्तानTwitterट्विटर