शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही...", मनू भाकरने सांगितली करिअरची नवी दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 21:50 IST

मनू भाकर प्रसिद्धीच्या झोतात आहे.

manu bhaker paris olympic 2024 : ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदक जिंकणारी मनू भाकर आज अनेकांसाठी प्रेरणा आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर तिने जोरदार पुनरागमन करत ऐतिहासिक कामगिरी केली. विविध स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चेन्नईतील एका शालेय कार्यक्रमात बोलताना २२ वर्षीय मनूने उपस्थित विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगितले. तिचा प्रवास सांगताना मनूने विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे कसे वळतील यावर भर दिला. तसेच क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी असल्याचे तिने नमूद केले. 

मनूने सांगितले की, टोकियो ऑलिम्पिकपासून पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास फार खडतर होता. निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा नव्या जोमाने सराव करणे हे आव्हानात्मक होते. मी जगात दुसऱ्या क्रमांकावर होती, पण तिथेही समाधानी नव्हती. कारण मला माहिती आहे खेळात विजय आणि पराभवाची चाचणी होत असते. हेच तर खेळाचे सौंदर्य आहे. कधी तुम्ही जिंकता तर कधी हरता... पण यासाठी तुम्हाला कठोर मेहनत ही घ्यावीच लागेल. 

क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी - मनू मनू पुढे म्हणाली की, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि सातत्याने चांगले कार्य करत राहावे लागेल. सुरुवात छोटी असली तरी स्वप्न नेहमी मोठे पाहायला हवे. मी हाच मंत्र घेऊन पुढे चालत असते... हार जीत याचा फारसा विचार करत नाही. आपल्याकडे करिअर घडवण्यासाठी खूप सारे पर्याय आहेत. त्यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे असे काही नाही. क्रीडा क्षेत्रातील जीवन खूप सुंदर आहे. इथे आर्थिक मदतीपासून ते सर्वकाही मिळते. यासाठी तुम्हाला स्वत:हून यात रस दाखवायला हवा. तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला देखील इंग्रजी बोलणाऱ्या लोकांशी कसा संवाद साधायचा याची कल्पना नव्हती. इतर अनेक गोष्टी मला कधीच माहित नव्हत्या. पण, मी स्वत:ला शिकायला मदत केली आहे.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Social Viralसोशल व्हायरलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी