मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत

By Admin | Updated: July 15, 2017 00:51 IST2017-07-15T00:51:20+5:302017-07-15T00:51:20+5:30

मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही सध्याची विजेती जोडी कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली

Manu and Sumit in the quarter-finals; Lose love | मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत

मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत


कॅलागरी : मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही सध्याची विजेती जोडी कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. पुरुष एकेरीत मात्र एच.एस. प्रणयला पराभवाचे तोंड पहावे लागले.
मनू-सुमित या तिसऱ्या मानांकित जोडीने कोरियाचे चोई सोलग्यू-जी किम यांचा ४५ मिनिटांत २१-१७, १७-२१, २१-१३ ने पराभव केला.
प्रणय-जेरी चोपडा ही दुसरी मानांकित जोडी मिश्र प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली. या जोडीने नेदरलॅन्डचा रॉबिन टेबलिंग-चेली सीनेन यांच्यावर २१-११, २१-१७ ने विजय साजरा केला. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये विजेत्या राहिलेल्या या जोडीला आता कोरियाच्या खेळाडूंविरुद्ध झुंज द्यावी लागेल.
पुरुष एकेरीत प्रणयसह अन्य भारतीय खेळाडू पराभूत झाले. दुसरा मानांकित प्रणयने पहिला गेम जिंकल्यानंतरही कोरियाचा जियोन हिसोक याच्याकडून त्याला २१-१७, १४-२१, १३-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. करण राजन जपानचा कोकी वलानाबे याच्याकडून १८-२१,१४-२१ ने पराभूत झाला.
राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यपला दुसऱ्या फेरीत वतानाबे याच्याकडून १०-२१, २१-१०, १५-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत रुत्विका गाडे आणि राष्ट्रीय चॅम्पियन रितुपर्णा दास या पराभूत झाल्या. (वृत्तसंस्था)

Web Title: Manu and Sumit in the quarter-finals; Lose love