मनप्रीतकडे भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व
By Admin | Updated: May 18, 2017 20:14 IST2017-05-18T20:14:38+5:302017-05-18T20:14:38+5:30
विश्व लीग सेमीफायनल तसेच जर्मनीत आयोजित तीन देशांच्या आमंत्रित स्पर्धेसाठी हाफबॅक मनप्रीतसिंग याच्याकडे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

मनप्रीतकडे भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 : विश्व लीग सेमीफायनल तसेच जर्मनीत आयोजित तीन देशांच्या आमंत्रित स्पर्धेसाठी हाफबॅक मनप्रीतसिंग याच्याकडे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. नियमित कर्णधार पी.आर. श्रीजेश हा गुडघ्याच्या जखमेमुळे बाहेर आहे. श्रीजेशला सुल्तान अजशनशाह चषक स्पर्धेदरम्यान जखम झाली होती. चिंग्लेनसनासिंग हा संघाचा उपकर्णधार असेल.
तिरंगी मालिकेचे आयोजन जर्मनीच्या डसेलडोर्फ शहरात १ जूनपासून तसेच विश्व हॉकी लीग सेमीफायनल लंडनमध्ये १५ जूनपासून होणार आहे. १८ सदस्यांचा भारतीय संघ तिरंगी मालिकेत जर्मनी आणि बेल्जियमविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल. लंडन विश्व हॉकी लीगमध्ये भारताला ब गटात कॅनडा, नेदरलँड, पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यासोबत स्थान मिळाले. संघात प्रदीप मोर, कोथाजितसिंग, रुपिंदरपालसिंग, आणि हरमनप्रीतसिंग हे बचावफळी सांभाळतील. आकाश चिकटे आणि विकास दहिया हे गोलकिपर राहतील. मधल्या फळीत एस. के. उथप्पा, सतबीरसिंग, हरजीतसिंग, चिंग्लेनसनासिंग, अनुभवी मनप्रीतआणि सरदारसिंग हे खेळाडू असून आक्रमक फळीची जबाबदारी रमनदीपसिंग, एस. व्ही. सुनील, आकाशदीपसिंग, तलविंदरसिंग आणि मनदीपसिंग
यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स म्हणाले,ह्यआम्ही सुल्तान अझलन शाह स्पर्धेनंतर काही बदल करू इच्छित होतो. युवकांना संधी देत आहोत. विश्व हॉकी लीगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचणे आमचे उद्दिष्ट
आहे.
भारतीय हॉकी संघ
गोलकीपर :आकाश चिकटे, विकास दहिया.
बचावफळी : प्रदीप मोरे, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, रुपिंदर पालसिंग,
हरमनप्रीतसिंग, मधली फळी : चिंग्लेनसनासिंग, एस. के. उथप्पा, सतबीरसिंग,
सरदारसिंग, मनप्रीतसिंग (कर्णधार), हरजीतसिंग. आक्रमक फळी: रमनदीपसिंग,
एस. व्ही. सुनील,तलविंदरसिंग,मनदीपसिंग,आकाशदीपसिंग.