शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

मंजिरी भावसार ठरली मिस मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 21:40 IST

हीरा सोलंकी दुसऱ्या, तर निशरिन पारिख तिसऱ्या स्थानी

मुंबई: पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी आरोग्य प्रतिष्ठानने अत्यंत अभूतपूर्वरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्रीच्या महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात सात खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यामुळे लक्षवेधी झालेल्या या स्पर्धेत मंजिरीने तळवलकर्सच्या हीरा सोलंकीवर मात करीत आपले पहिलेवहिले मिस मुंबई जेतेपद संपादले. 52 वर्षांची तरूणी निशरिन पारिख तिसरी आली. तसेच या स्पर्धेत चंदिगड येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱया आमला ब्रम्हचारी आणि श्रद्धा डोके या मऱहाटमोळ्या पीळदार शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या सौष्ठव प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली. परळच्या रेल्वे वर्कशॉपच्या मैदानात मुंबईकरांना शरीरसौष्ठवाचे सौंदर्य आणि थरार एकाच वेळी अनुभवता आले. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्रत्येक गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी सहाही खेळाडूंमध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला. प्रत्येक गटात गटविजेता निवडताना जजेसना तारेवरची कसरत करताना कंपेरिजन घ्यावी लागली. 55 किलो वजनी गटात वक्रतुंड जिमच्या नितीन शिगवणने माँसाहेब जिमच्या जितेंद्र पाटीलवर मात केली. 60 किलो वजनी गटात परब फिटनेसच्या देवचंद गावडेचे कडवे आव्हान आर.एम.भटच्या अविनाश वनेने मोडून काढले. वसंत जिमचा उमेश गुप्ता 65 किलो वजनी गटात सरस ठरला. त्याने अनुभवी संदेश सकपाळला मागे टाकले तर 70 किलो वजनी गटात बाल मित्र व्यायामशाळेच्या रोहन गुरवने संदीप कवडे, महेश पवारपेक्षा सरस सौष्ठवाचे प्रदर्शन करीत गटविजेतपदावर आपले नाव कोरले. 75 किलो वजनी गटात ग्रेस जिमच्या भास्कर कांबळीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. 80 किलो वजनी गटात संघर्षच संघर्ष80 किलो वजनी गट हा या स्पर्धेतला सर्वोत्तम गट होता. या गटातील सहाही खेळाडू अव्वल स्थानाचे दावेदार होते. पण नवोदित मुंबई श्रीच्या विजेत्याने संभाव्य विजेत्या सुशील मुरकर, सुशांत रांजणकर यांना मागे टाकण्याचा पराक्रम करीत बाजी मारली. गेले दोन महिने एकही स्पर्धा न खेळलेला अनिलची शरीरयष्टी पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. स्पार्टन मुंबई श्री 2019 च्या अंतिम फेरीचा निकाल

55 किलो वजनी गट- 1. नितीन शिगवण (वक्रतुंड), 2. जितेंद्र पाटील (माँसाहेब), 3. राजेश तारवे (माँसाहेब), 4. नितेश कोळेकर (परब फिटनेस), 5. अजिंक्य पवार (बाळ व्यायाम मंदिर), 6. ओंकार आंबोकर (बॉडी वर्कशॉप)

60 किलो- 1. अविनाश वने (आर.एम.भट), 2. देवचंद गावडे (परब फिटनेस), 3. आकाश घोरपडे (करमरकर जिम),4. अरूण पाटील (जय भवानी), 5. चेतन खारवा (माँसाहेब),  6. तुषार गुजर (माँसाहेब)

65 किलो- 1. उमेश गुप्ता (वसंत जिम), 2. संदेश सकपाळ (परब फिटनेस), 3. जगदिश कदम (बॉडी वर्कशॉप), 4. बप्पन दास ( आरकेएम), 5. साजिद मलिक (फ्युचर फिटनेस), 6. निलेश घडशी (बॉडी वर्कशॉप)

70 किलो- 1. रोहन गुरव (बाल मित्र व्यायामशाळा), 2. संदीप कवडे ( एच.एम.बी. जिम), 3. महेश पवार (हर्क्युलस जिम), 4. मनोज मोरे (बाल मित्र व्यायामशाळा), 5. विशाल धावडे (बाल मित्र व्यायामशाळा), 6. गणेश पेडामकर ( बॉडी वर्कशॉप)

75 किलो-  1. भास्कर कांबळी (ग्रेस जिम),  2. मोहम्मद हुसेन (परब फिटनेस), 3. अमोल गायकवाड (मिशन फिटनेस), 4. अर्जुन पुंचिकुरवे (गुरूदत्त व्यायामशाळा), 5. लीलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), 6. आशिष लोखंडे (रिसेट फिटनेस).

80 किलो- 1. अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), 2. सुशील मुरकर (जे.एम.के.एम), 3. सुशांत रांजणकर (आर.एम.भट),  4. मोहम्मद शब्बीर शेख (परब फिटनेस), 5. सुयश पाटील (इन्सेन फिटनेस), 6. अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन)

मिस मुंबई (विमेन्स फिजीक स्पोर्टस्) 1. मंजिरी भावसार (एफएसटी जिम), नीना पंजाबी, 2. हीरा सोलंकी (तळवलकर्स जिम) 5. वीणा महाले (बॉडी वर्कशॉप), 4. रेणूका मुदलीयार (आर.के. फिटनेस), 3. निशरीन पारीख, 6. प्रतीक्षा करकेरा (बालिमत्र व्यायामशाळा) 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव