शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मनीषा वाघमारे हिने फडकावला एल्बु्रस शिखरावर तिरंगा

By admin | Published: August 02, 2015 11:28 PM

४0 पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती,

जयंत कुलकर्णी औरंगाबाद४0 पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती, जबरदस्त फिटनेस या बळावर औरंगाबाद येथील इंडियन कॅडेट फोर्सची साहसी वीरांगना मनीषा वाघमारे हिने युरोप खंडातील सर्वांत उंच असणारे बर्फाच्छादित एल्बु्रस शिखर यशस्वीपणे सर करण्याचा पराक्रम केला.रशियाची राजधानी मॉस्कोजवळ असणारे एल्बु्रस शिखर हे १८ हजार ६१0 फूट उंचीवर आहे. या मोहिमेसाठी औरंगाबादच्या मनीषा वाघमारेसह नागपूर आणि दिल्लीतील जवळपास सात ते आठ जणांचा गट भारतातून २४ जुलै रोजी रवाना झाला होता. या मोहिमेची सुरुवात मनीषाने २६ जुलै रोजी केली आणि मधील तीन टप्पे १८ तासांत यशस्वीपणे पूर्ण केले. ३0 जुलैला विश्रांती घेतल्यानंतर तिने ३१ जुलै रोजी एल्ब्रुस शिखर सर करण्यास सुरुवात केली. ६ वाजता ती सॅडल रॉकला पोहोचली. एल्ब्रुस शिखर सर करताना तिला दुखापतही झाली; परंतु अदम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर मनीषाने ९ वाजता एल्ब्रुस शिखरावर तिरंगा फडकावण्याचा पराक्रम केला.याआधी मनीषा वाघमारे हिने गेल्या वर्षी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसह १0 जणांच्या पथकासह पूर्ण बर्फाळ असणाऱ्या आॅस्ट्रेलियातील माऊंट कोसिस्को, माऊंट टाऊनसेंड, माऊंट राम्सहेड, माऊंट इवरारिज, माऊंट राम्सहेड नॉर्थ, माऊंट आलिस, माऊंट साऊथ वेस्ट आॅफ अब्बीट पीक, माऊंट कॅरवर ही शिखरे सर करण्याचा भीमपराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी शिखरे सर करणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिलीच गिर्यारोहक आहे.------------जीवनातील सर्वांत खडतर मोहीम : मनीषा वाघमारे माझ्या जीवनातील सर्वात खडतर अशी ही मोहीम होती. हवामानही एकसारखे नव्हते. कधी जोरदार वादळ तर कधी जोऱ्याची हवा. ४0 पेक्षाही कमी तापमान आणि त्यातच झालेली दुखापत. तथापि, मार्गदर्शकांनी आपल्याला प्रोत्साहन दिले आणि भारत आणि माझ्या गुरूंसाठी मी एल्ब्रुस शिखर सर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशस्वी झाल्याचा मनस्वी आनंद वाटतोय. गुरुपौर्णिमेची माझ्या सर्व गुरुंना ही एक भेटच आहे, अशी प्रतिक्रिया औरंगाबादची साहसी वीरांगना मनीषा वाघमारे हिने रशिया येथून लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आपल्याला माझे गाईड सुरेंद्र शेळके (पुणे), विनोद नरवडे (औरंगाबाद), आनंद बनसोडे (सोलापूर), भीमराव खाडे (परभणी), जगदीश खैरनार आणि फिटनेस कोच शशिकांत यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे तिने सांगितले.