मनीषा वाघमारे हिने फडकावला एल्बु्रस शिखरावर तिरंगा

By admin | Published: August 2, 2015 11:28 PM2015-08-02T23:28:36+5:302015-08-02T23:28:36+5:30

४0 पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती,

Manisha Waghmare has flown to the elbus crematorium | मनीषा वाघमारे हिने फडकावला एल्बु्रस शिखरावर तिरंगा

मनीषा वाघमारे हिने फडकावला एल्बु्रस शिखरावर तिरंगा

Next

जयंत कुलकर्णी औरंगाबाद
४0 पेक्षा कमी तापमान, हवामानातही स्थिरता नाही, त्यातच वादळ अशा खडतर परिस्थितीत अदम्य इच्छाशक्ती, प्रबळ आत्मविश्वास, साहसीवृत्ती, जबरदस्त फिटनेस या बळावर औरंगाबाद येथील इंडियन कॅडेट फोर्सची साहसी वीरांगना मनीषा वाघमारे हिने युरोप खंडातील सर्वांत उंच असणारे बर्फाच्छादित एल्बु्रस शिखर यशस्वीपणे सर करण्याचा पराक्रम केला.
रशियाची राजधानी मॉस्कोजवळ असणारे एल्बु्रस शिखर हे १८ हजार ६१0 फूट उंचीवर आहे. या मोहिमेसाठी औरंगाबादच्या मनीषा वाघमारेसह नागपूर आणि दिल्लीतील जवळपास सात ते आठ जणांचा गट भारतातून २४ जुलै रोजी रवाना झाला होता. या मोहिमेची सुरुवात मनीषाने २६ जुलै रोजी केली आणि मधील तीन टप्पे १८ तासांत यशस्वीपणे पूर्ण केले. ३0 जुलैला विश्रांती घेतल्यानंतर तिने ३१ जुलै रोजी एल्ब्रुस शिखर सर करण्यास सुरुवात केली. ६ वाजता ती सॅडल रॉकला पोहोचली. एल्ब्रुस शिखर सर करताना तिला दुखापतही झाली; परंतु अदम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर मनीषाने ९ वाजता एल्ब्रुस शिखरावर तिरंगा फडकावण्याचा पराक्रम केला.
याआधी मनीषा वाघमारे हिने गेल्या वर्षी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसह १0 जणांच्या पथकासह पूर्ण बर्फाळ असणाऱ्या आॅस्ट्रेलियातील माऊंट कोसिस्को, माऊंट टाऊनसेंड, माऊंट राम्सहेड, माऊंट इवरारिज, माऊंट राम्सहेड नॉर्थ, माऊंट आलिस, माऊंट साऊथ वेस्ट आॅफ अब्बीट पीक, माऊंट कॅरवर ही शिखरे सर करण्याचा भीमपराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी शिखरे सर करणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिलीच गिर्यारोहक आहे.

------------
जीवनातील सर्वांत खडतर मोहीम : मनीषा वाघमारे
माझ्या जीवनातील सर्वात खडतर अशी ही मोहीम होती. हवामानही एकसारखे नव्हते.
कधी जोरदार वादळ तर कधी जोऱ्याची हवा. ४0 पेक्षाही कमी तापमान आणि त्यातच झालेली दुखापत. तथापि, मार्गदर्शकांनी आपल्याला प्रोत्साहन दिले आणि भारत आणि माझ्या गुरूंसाठी मी एल्ब्रुस शिखर सर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशस्वी झाल्याचा मनस्वी आनंद वाटतोय.
गुरुपौर्णिमेची माझ्या सर्व गुरुंना ही एक भेटच आहे, अशी प्रतिक्रिया औरंगाबादची साहसी वीरांगना मनीषा वाघमारे हिने रशिया येथून लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
आपल्याला माझे गाईड सुरेंद्र शेळके (पुणे), विनोद नरवडे (औरंगाबाद), आनंद बनसोडे (सोलापूर), भीमराव खाडे (परभणी), जगदीश खैरनार आणि फिटनेस कोच शशिकांत यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Manisha Waghmare has flown to the elbus crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.