मंदार महाले कर्णधार
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:23+5:302015-01-23T23:06:23+5:30
मंदार महाले विदर्भ

मंदार महाले कर्णधार
म दार महाले विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार नागपूर : मेरठ येथे २७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित चौथ्या राजसिंग डुंगरपूर चषक १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या विदर्भ संघाचे नेतृत्व मंदार महाले याच्याकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत यजमान उत्तर प्रदेशशिवाय विदर्भ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड संघांचा समावेश राहील. राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळविले जातील. विदर्भ संघ असा :- मंदार महाले कर्णधार, केतन आळशी, सत्यम शर्मा यष्टिरक्षक, हार्दिक वर्मा, प्रणय झा, रोहित दत्तात्रय, दर्शन भजन, गुलाम अली, मनन दोशी, अंकित पांडे, आदित्य साबळे, अमन मोखाडे, मन डेहनकर, प्रेरित अग्रवाल आणि शुभम शर्मा.(क्रीडा प्रतिनिधी)