मँचेस्टर युनायटेडला अजिंक्यपद

By Admin | Updated: August 6, 2014 01:28 IST2014-08-06T01:28:27+5:302014-08-06T01:28:27+5:30

मँचेस्टर युनायटेडने आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप फुटबॉल फ्रेंडली स्पर्धेच्या फायनलमध्ये लिवरपूलवर 3-1 असा शानदार विजय मिळवत जेतेदावर नाव कोरल़े

Manchester United win championship | मँचेस्टर युनायटेडला अजिंक्यपद

मँचेस्टर युनायटेडला अजिंक्यपद

मियामी : वायने रुनी, जुआन माटा आणि जेसी लिंगार्ड (प्रत्येकी 1 गोल) यांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप फुटबॉल फ्रेंडली स्पर्धेच्या फायनलमध्ये लिवरपूलवर 3-1 असा शानदार विजय मिळवत जेतेदावर नाव कोरल़े 
सन लाइफ स्टेडियमवर 51 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात लिवरपूलच्या स्टीवन गेरार्ड याने 14व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली़ मात्र, दुस:या हाफमध्ये रुनी याने 55व्या मिनिटाला गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली़ याच्या दोन मिनिटांनंतर माटा याने शानदार गोल नोंदविला़ त्यामुळे मँचेस्टरची आघाडी 2-1 अशी झाली़ लिंगार्ड याने संघासाठी तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी मिळवून दिली़ त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ ही आघाडी मोडून काढू शकला नाही़ मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक गॉल म्हणाले, ‘‘आम्ही लिवरपूलसारख्या अनुभवी संघाला पराभूत करू शकलो याचा आनंद आह़े मात्र, आता प्रीमिअर लीगमध्ये स्वानसी सीटी विरुद्ध होणा:या सामन्यावर आमची नजर आह़े या लढतीत आम्ही विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करू़’’ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Manchester United win championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.