रुनीच्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा दुसरा विजय

By Admin | Updated: September 29, 2014 06:34 IST2014-09-29T06:34:12+5:302014-09-29T06:34:12+5:30

इंग्लिश प्रीमिअम लीगच्या शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत मँचेस्टर युनायटेडने वॅन रुनीच्या जबरदस्त खेळाच्या बळावर वेस्ट हॅम युनायटेडचा २-१ने पराभव

Manchester United second win after Rune's goal | रुनीच्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा दुसरा विजय

रुनीच्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडचा दुसरा विजय

केदार लेले, लंडन
इंग्लिश प्रीमिअम लीगच्या शनिवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत मँचेस्टर युनायटेडने वॅन रुनीच्या जबरदस्त खेळाच्या बळावर वेस्ट हॅम युनायटेडचा २-१ने पराभव करून स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. इतर लढतीत चेल्सीने अ‍ॅस्टन विलाचा ३-० असा पराभव केला आणि गतविजेत्या मँचेस्टर सिटीने हल सिटीवर ४-२ अशा फरकाने मात केली. क्रिस्टन पॅलेसने लेस्टर सिटीचा २-० असा पराभव केला, तर साऊथ अँम्टन संघाने क्वीन्स पार्क रेंजर्सचा २-१ ने पराभव केला. तसेच ‘अ‍ॅनफिल्ड डर्बी’मध्ये झालेल्या लढतीत लिव्हरपूलला एव्हर्टनचे, तर ‘लंडन डर्बी’मध्ये आर्सनलने टोटनमला १-१ असे बरोबरीत रोखले. अन्य एका सामन्यामध्ये संडरलँड आणि स्वान्सी सिटी यांची लढत बरोबरीत सुटली.
इपीएलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम अ‍ॅलन शेरर (२६० गोल) आणि अँडी कोल (१८९ गोल) यांच्या नावावर आहे. वेस्ट हॅम विरुद्ध पाचव्या मिनिटाला गोल करीत मॅन्चेस्टर युनायटेडच्या वेन रुनी (१७५ गोल) या दोघांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. रॉबी वॅन पर्सीने (२२ व्या मिनिटाला) गोल नोंदवून मँचेस्टर युनायटेडला २-० अशी आघाडी मिळवून दिली. वेस्ट हॅमतर्फे सॅकोने (३७ व्या मिनिटाला) गोल करीत मँचेस्टर युनायटेडची आघाडी २-१ अशी कमी केली.
मँचेस्टर युनायटेडचा कर्णधार वेन रुनीला धसमुसळ्या खेळाबद्दल लाल कार्ड दाखविण्यात आले. ५९ व्या मिनिटापासून मँचेस्टर युनायटेड संघ दहा खेळाडूंनीच खेळत होता. मात्र, दहा खेळाडूंनिशी खेळणाऱ्या मँचेस्टर युनायटेडचा संघ २-१ ही आघाडी अखेरपर्यंत राखण्यात यशस्वी झाला.
चेल्सीने केला अ‍ॅस्टन विलाचा पाडाव
चेल्सीने अ‍ॅस्टन विलाचा ३-० असा पराभव केला. आॅस्कर (११ व्या मिनिटाला) आणि अनुभवी स्ट्रायकर दिएगो कॉस्टा (६९ व्या मिनिटाला) याने पूर्वार्धात व उत्तरार्धात प्रत्येकी एक-एक गोल करून चेल्सीच्या विजयास हातभार लावला.

Web Title: Manchester United second win after Rune's goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.