मॅन्चेस्टर सिटीला जेतेपद
By Admin | Updated: May 12, 2014 04:19 IST2014-05-12T04:19:51+5:302014-05-12T04:19:51+5:30
सॅमीर नासरी आणि कर्णधार विंसेंट कोम्पनी यांच्या अप्रतिम गोलच्या बळावर मॅन्चेस्टर सिटीने गेल्या तीन सत्रात दुसर्यांचा इंग्लिश प्रीमिअर लीगचा किताब आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला.

मॅन्चेस्टर सिटीला जेतेपद
मॅन्चेस्टर : सॅमीर नासरी आणि कर्णधार विंसेंट कोम्पनी यांच्या अप्रतिम गोलच्या बळावर मॅन्चेस्टर सिटीने गेल्या तीन सत्रात दुसर्यांचा इंग्लिश प्रीमिअर लीगचा किताब आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी वेस्ट हॅमला २-० असे लोळवले. ईपीएलच्या शेवटच्या साखळी लढतीत त्यांना या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी अवघ्या एका गुणाची आवश्यकता होती. व्यवस्थापक मॅन्युएल पेलेग्रिनी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना सिटीचा पहिलाच इंग्लिश चॅम्पियनशिपचा किताब आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच सिटीने कॅपिटल वन चषक जेतेपद पटकावले होते आणि त्यांनी या हंगामाचा शेवटही धमाकेदार केला. या जेतेपदासाठी सिटीसमोर आव्हान होते ते लिव्हरपुलचे. या अटीतटीच्या लढतीत सिटीला जेतेपदावर नाव कोरण्यासाठी केवळ एका गुणाची आवश्यकता होती. ४०व्या मिनिटाला तो गुण सॅमीर नासरीने मिळवून दिला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. दुसर्या हाफमध्ये कर्णधार कोम्पनीने गोल करून सिटीचा विजय द्विगणीत केला. सिटीने येथे खेळलेल्या १९ सामन्यांपैकी १७ मध्ये विजय साजरे केले आहेत. या विजयानंतर सिटीचे व्यवस्थापक मॅन्युएल म्हणाले, मला असे वाटते की मी चांगली टीम घेऊन मैदानावर खेळ केला. प्रेक्षकांकडूनही चांगला पाठींबा मिळाला. योग्य निर्णय घेण्यासाठी मला शांत राहणे आवश्यक होते. हे सत्र माझ्यासाठी खूप खास होते. खेळाडूंनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि त्यांच्या विश्वासावर मी खरा उतरलो. (वृत्तसंस्था)