भारताला मलेशियाचा अडथळा
By Admin | Updated: April 15, 2016 04:15 IST2016-04-15T04:15:20+5:302016-04-15T04:15:20+5:30
न्यूझीलंडकडून पराभूत होताच समीकरण बिघडल्यानंतर भारतीय संघाला २५व्या अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी खेळायची झाल्यास शुक्रवारी मलेशियाला पराभूत करण्याचे

भारताला मलेशियाचा अडथळा
इपोह : न्यूझीलंडकडून पराभूत होताच समीकरण बिघडल्यानंतर भारतीय संघाला २५व्या अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी खेळायची झाल्यास शुक्रवारी मलेशियाला पराभूत करण्याचे आव्हान असेल.
पाच वेळेचा चॅम्पियन भारत स्पर्धेत अद्याप सातत्यपूर्ण कामगिरी करूशकलेला नाही. मलेशियाला नमवले, तरच आॅस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक लढतीसाठी सज्ज होता येईल. आॅस्ट्रेलिया संघ सलग पाच विजयांसह १५ गुण घेऊन अंतिम फेरीत दाखल झाला आहे. मागचा रेकॉर्ड पाहता, भारताचे पारडे मलेशियाच्या तुलनेत जड वाटते. मलेशियाने मागच्या वर्षी मात्र भारताला याच स्पर्धेत नमविले होते.
उभय संघांत अखेरचा सामना खेळला गेला तो बेल्जियमच्या एंटवर्प शहरात. विश्व सेमीफायनल लीगमध्ये भारताने मलेशियावर ३-२ ने विजय साजरा केला.
या पराभवामुळे मलेशिया आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याच्या उद्देशाने मलेशिया आज भारताविरुद्ध खेळणार आहे. मलेशियाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा झाल्यास भारतावर किमान सात गोलने विजय
नोंदवावा लागणार आहे. भारताला पराभूत केल्याने मलेशिया आणि न्यूझीलंडचे गुण समान होतील. सात गोलनी पराभूत करताच हा संघ न्यूझीलंडच्या तुलनेत सरासरीतही पुढे असेल. न्यूझीलंडचे सहा सामन्यांत ११ गुण, तर भारताचे पाच सामन्यांत ९ गुण आहेत. (वृत्तसंस्था)