कॅमेरून, क्रोएशियासाठी ‘करा अथवा मरा’

By Admin | Updated: June 18, 2014 05:48 IST2014-06-18T05:48:36+5:302014-06-18T05:48:36+5:30

कॅमेरून आणि क्रोएशिया या संघांना फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे दोन्ही संघ अ गटात आपले आव्हान कायम

'Make or die' for Cameron, Croatia | कॅमेरून, क्रोएशियासाठी ‘करा अथवा मरा’

कॅमेरून, क्रोएशियासाठी ‘करा अथवा मरा’

मनाउस : कॅमेरून आणि क्रोएशिया या संघांना फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे दोन्ही संघ अ गटात आपले आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरतील़ या सामन्यात कॅमेरूनची बाजू वरचढ असली, तरी त्यांचा स्टार स्ट्रायकर सॅम्युअल इटो गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळणार नसल्यामुळे संघ अडचणीत सापडला आहे़
विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात क्रोएशियाला पाच वेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या ब्राझीलने ३-१ ने धूळ चारली होती,
तर अन्य लढतीत कॅमेरूनला मेक्सिकोविरुद्ध १-० असा पराभव स्वीकारावा लागला होता़ सध्या दोन्ही संघांची तुलना केल्यास कॅमेरूनची बाजू वरचढ वाटत आहे़ मात्र, त्यांचा कर्णधार सॅम्युअल इटो हा दुखापतीमुळे बाहेर झाल्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो़ चार वेळा ‘आफ्रिकन फुटबॉल आॅफ द इयर’ पुरस्कारप्राप्त इटो गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे़
दुसरीकडे क्रोएशियासाठी कॅमेरूनविरुद्ध खेळणे हा एक नवा अनुभव असणार आहे़ कारण या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत एकाही आफ्रिकन संघाचा सामना केलेला नाही़ क्रोएशियाचे प्रशिक्षक निको कोवाच म्हणाले, की कॅमेरूनविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत आमचा अनुभवी खेळाडू लुका मोडिरिकचा संघात सहभाग असणार आहे़ तो संघासाठी नक्कीच विशेष कामगिरी करून दाखवेल़ लुका सलामीच्या सामन्यात पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता़
(वृत्तसंस्था)

Web Title: 'Make or die' for Cameron, Croatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.