शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Khel Ratna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 17:24 IST

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 : भारतीय खेळाडूंनी यंदा टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवत अविश्वसनीय कामगिरी केली. आज राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात १२ खेळाडूंना खेलरत्न व ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलं.

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 : भारतीय खेळाडूंनी यंदा टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवत अविश्वसनीय कामगिरी केली. भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) यानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. १२५ वर्षांच्या इतिहासात भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धेतील  ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर हे भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक ठरले. यासह अनेक खेळाडूंनी भारताला ऐतिहासिक क्षण दाखवले. त्यामुळेच यंदा नीरज चोप्रासह १२ खेळाडूंचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.  

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीत सिंह यांनाही  खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.   पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमीत अंतिल यांनाही आज गौरविण्यात आले.    पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत,  महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री हेही या पुरस्काराचे मानकरी ठरले. फुटबॉल स्टार आणि भारताचा कर्णधार सुनील छेत्री याचा होणारा सन्मान ऐतिहासिक ठरला आहे. आता पर्यंत कधीही खेलरत्न पुरस्कारासाठी फुटबॉलपटूची शिफारस झालेली नाही. त्यामुळे छेत्रीचा होणारा गौरव भारतीय फुटबॉलसाठे अत्यंत अभिमानास्पद आहे. मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. 

खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू - नीरज चोप्रा (अ‍ॅथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पी.आर.श्रीजेश (हॉकी), लोव्हलिना बोरगोहाई (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (बॅडमिंटन), सुमीत अंतिल (भालाफेक), अवनी लेखरा (नेमबाजी), कृष्णा नागर (बॅडमिंटन), एम नरवाल (नेमबाजी), मनप्रीत सिंग ( हॉकी) 

क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज आणि उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आणि  ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंसह ३५ जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राMithali Rajमिताली राजSunil Chhetriसुनील छेत्रीShikhar Dhawanशिखर धवन