चुरस विजयी लय कायम राखण्याची!
By Admin | Updated: October 16, 2014 01:33 IST2014-10-16T01:33:56+5:302014-10-16T01:33:56+5:30
नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि अॅटलेटिको डी कोलकाता हे इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) दोन तगडे संघ गुरुवारी फटोदरा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भिडणार आहेत.

चुरस विजयी लय कायम राखण्याची!
शिलाँग : नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि अॅटलेटिको डी कोलकाता हे इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) दोन तगडे संघ गुरुवारी फटोदरा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भिडणार आहेत. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यातच आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलमी दिली होती. त्यामुळे गुरुवारच्या या लढतीत अटीतटीची चुरस पाहायला मिळेल हे नक्की.
कोलकाताने पहिल्याच लढतीत मुंबई सिटी एफसीचा ३-० असा धुव्वा उडवून स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या धमाक्यात केले होते. फिकरू टेफेरा याने या स्पर्धेतील पहिल्या गोलची नोंद करून कोलकाताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याला बोर्जा फर्नांडिस आणि अरनाल लिबर्ट यांच्याकडूनही उत्तम साथ लाभली होती. या लढतीत कोलकाताने त्यांच्या आक्रमणाची धार मुंबईला दाखवली होती. अॅटलेटिको संघाला बोर्जा फर्नांडिस, कॅवीन लोबो, आॅफेत्सें नाटो हे आंतरराष्ट्रीय स्टार मिडफिल्डरची धुरा संभाळतील. त्यांना लुईस गार्सिआ, जाकुब पोडनी आणि संजू प्रधान, फिकरू टेरेफा, अर्नाल लिबर्ट, मोहम्मद रफी आणि बलजित शाहनी यांची चांगली साथ मिळेल. दुसरीकडे नॉर्थ ईस्ट युनायटेडनेही केरला ब्लास्टर संघावर १-० असा विजय मिळवून दमदार सलामी दिली असल्याने त्यांचेही मनोबल उंचावले आहे. अलेक्साड्रो त्झोर्वास याने गोलकिपरची भूमिका अचुक
पार पाडली असून त्याला पर्याय म्हणून रेहनेश टीपी आणि कुंजांग भुटिआ हेही सज्ज आहेत. (वृत्तसंस्था)