मुख्य हॉकी कोच एस यांची हकालपट्टी

By Admin | Published: July 25, 2015 02:27 AM2015-07-25T02:27:52+5:302015-07-25T02:27:52+5:30

भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वान एस यांची हॉकी इंडियाने

Main Hockey Coach S extortion | मुख्य हॉकी कोच एस यांची हकालपट्टी

मुख्य हॉकी कोच एस यांची हकालपट्टी

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वान एस यांची हॉकी इंडियाने शुक्रवारी अधिकृत हकालपट्टी केली. हॉलंडच्या या कोचला मायदेशी परत पाठविण्याचा निर्णय होताच आठवडाभरापासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.
वान एस यांनी सोमवारी वक्तव्य करीत हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी त्यांना पदावरून दूर सारल्याचे म्हटले होते. बत्रा यांनी त्यांना पदावरून दूर केलेले नसल्याचा पुनरुच्चार करीत कोचबाबत निर्णय घेण्यासाठी समिती असल्याचा दावा केला होता. माजी आॅलिम्पिकपटू आणि खेळाडूंचा समावेश असलेल्या हॉकी इंडियाच्या समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत अखेर पॉल वान एस यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतला.
हॉकी इंडियाने बेल्जियमच्या एन्टवर्प शहरात झालेल्या विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत भारताच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी गत रविवारी विशेष समिती स्थापन केली होती. पुरुष संघ उपांत्य फेरीत दाखल झाल्यानंतर चौथ्या स्थानावर राहिला होता. महिला संघ उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होताच पाचव्या स्थानावर घसरला. समितीच्या अध्यक्षस्थानी माजी आॅलिम्पिकपटू
हरविंदरसिंग होते. अन्य सदस्यांत बी. पी. गोविंदा, व्ही. भास्करन, ए.
बी. सुबय्या, तोयबासिंग, आर. पी. सिंग, असुंता लाक्रा आणि जसजित कौर यांचा समावेश आहे. या बैठकीत पॉल वान एस यांचा मुद्दा चर्चेला आलाच.
५४ वर्षांचे पॉल वान यांनी हॉलंडमधील आपल्या घरून जो ई-मेल पाठविला त्यात, ‘मला बत्रा यांनी बळजबरीने हटविले असून, हॉकी इंडियाने मला पुरावे देण्यास सांगितल्यास मी स्वत:ची बाजू मांडू शकतो. हॉकी इंडियाचा अखेरचा फैसला पाहून मी हा मेल सार्वजनिक करू शकतो’ म्हटले.(वृत्तसंस्था)

Web Title: Main Hockey Coach S extortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.