२०१८ च्या टी-२० विश्वचषकासाठी १२ संघांचा मुख्य ड्रा योजना

By Admin | Updated: June 29, 2016 21:15 IST2016-06-29T21:15:33+5:302016-06-29T21:15:33+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१८ च्या टी-२० विश्वचषकात १२ संघांना मुख्य ड्रॉमध्ये स्थान देण्याचा विचार मांडला आहे

The main draw scheme of 12 teams for the 2018 T20 World Cup | २०१८ च्या टी-२० विश्वचषकासाठी १२ संघांचा मुख्य ड्रा योजना

२०१८ च्या टी-२० विश्वचषकासाठी १२ संघांचा मुख्य ड्रा योजना

ऑनलाइन लोकमत
एडिनबर्ग, दि. २९ : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१८ च्या टी-२० विश्वचषकात १२ संघांना मुख्य ड्रॉमध्ये स्थान देण्याचा विचार मांडला आहे.आयसीसी वार्षिक संमेलनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या असोसिएट देशांच्या बैठकीनंतर हा विचार पुढे आला. ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, असोसिएट देशांच्या प्रतिनिधींना आयसीसी बोर्डात पूर्ण मतदानाचा अधिकार बहाल केला जाऊ शकतो, असे संकेत मिळाले आहेत.
हाँगकाँग क्रिकेट बोर्डाचे सीईओ टिम कटलर म्हणाले, ह्यमी जे ऐकले त्यानुसारदोन संघांचा आणखी समावेश करीत १२ संघांचा मुख्य ड्रॉ तयार केला जाईल.सध्या या पद्धतीवर सहमती झाली असल्याचे कळते. हे योग्य दिशेने उचललेले पाऊल म्हणावे लागेल.
वृत्तानुसार आयसीसी चेअरमन शशांक मनोहर यांनी ही घोषणा करीत सांगितले की, आयसीसीच्या असोसिएट देशांच्या तीन प्रतिनिधींना पूर्ण मतदानाचा हक्क बहाल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या आठवडाअखेरीस प्रस्तावास मंजुरी मिळू
शकते. (वृत्तसंस्था)

Web Title: The main draw scheme of 12 teams for the 2018 T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.