माही फिश टिक्का अन् रैना कुल्फी
By Admin | Updated: October 4, 2015 23:46 IST2015-10-04T23:46:22+5:302015-10-04T23:46:22+5:30
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नववधूसारख्या नटलेल्या कानपूरमध्ये खेळाडूंच्या पाहुणचारात कोणतीच कसर राहू नये

माही फिश टिक्का अन् रैना कुल्फी
कानपूर : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नववधूसारख्या नटलेल्या कानपूरमध्ये खेळाडूंच्या पाहुणचारात कोणतीच कसर राहू नये, म्हणून प्रत्येकजण आपआपल्या परीने कामाला लागला असून खेळाडूंचे वास्तव्य असणाऱ्या हॉटेलमध्ये अनेक खास पदार्थ बनविले जाणार असून यात माही फिश टिक्का आणि रैना स्पेशल कुल्फी हे पदार्थही आहेत.
दोन्ही संघादरम्यानच्या पाच वन डे सामन्यातील पहिला सामना ११ आॅक्टोबरला येथील ग्रीनपार्क मैदानावर होणार आहे. शहरातील एकमेव फाईव्हस्टार हॉटेल लँडमार्क येथे खेळाडूंचे वास्तव्य असणार आहे. येथे त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत होणार आहे. हॉटेलचे व्यवस्थापक रमन अवस्थी यांनी सांगितले की, बीसीसीआयकडून आम्हाला ४५ पदार्थांची आॅर्डर मिळाली आहे. यात इंडियन, काँटिनेंटल, इटालियन
आणि फ्रेंच डिशेस समाविष्ट आहेत. हॉटेलने या पदार्थांना क्रिकेट टच
दिला आहे.
त्यामुळे खेळाडूंच्या भोजनात गुगली पनीर टिक्का मसाला, एप्रिकोट वाईड बॉल करी, रनआउट मेरीनेरा आणि द स्किपर्स सी फूड या पदार्थांचा समावेश आहे. पण हॉटेल प्रशासनाने माही फिश टिक्का आणि रैना स्पेशल कुल्फी हे पदार्थही खेळाडूंना खास आवडतील, असा दावा केला आहे.