महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपदावरून हटवा : मार्टिन क्रो

By Admin | Updated: August 15, 2014 00:25 IST2014-08-15T00:25:07+5:302014-08-15T00:25:07+5:30

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला कर्णधारपदावरून हटविण्यात यावे, असे मत न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन क्रो याने व्यक्त केले आहे़

Mahendra Singh Dhoni should be removed from the captaincy: Martin Crowe | महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपदावरून हटवा : मार्टिन क्रो

महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपदावरून हटवा : मार्टिन क्रो

वेलिंग्टन : इंग्लंडविरुद्ध सुरूअसलेल्या कसोटी मालिकेतील गचाळ कामगिरीनंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला कर्णधारपदावरून हटविण्यात यावे, असे मत न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन क्रो याने व्यक्त केले आहे़
क्रो म्हणाला, धोनी कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला तरीही भारतीय संघ त्याच्याविना चांगली कामगिरी करेल़ तो सध्या कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून अपयशी ठरला आहे़ धोनीच्या कर्णधारपदाखाली विदेशात आणखी एक मालिका गमावण्याची शक्यता आहे़ क्रो पुढे म्हणाला, धोनीची रणनीती केवळ मर्यादित षटकांच्या सामन्यात यशस्वी होते़ त्यामुळे त्याने आता कसोटीऐवजी पुढील वर्षी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आपले लक्ष्य केंद्रित करावे़ हेच त्याच्यासाठी योग्य ठरेल, असेही क्रो याने सांगितले़ (वृत्तसंस्था)

Web Title: Mahendra Singh Dhoni should be removed from the captaincy: Martin Crowe