महेंद्रसिंग धोनीने केली रैनाची पाठराखण
By Admin | Updated: October 20, 2015 02:40 IST2015-10-20T02:40:01+5:302015-10-20T02:40:01+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत खराब फॉर्मात असलेल्या सुरेश रैनाची कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाठराखण केली. मोठे फटके खेळण्यापूर्वी खेळपट्टीवर काही

महेंद्रसिंग धोनीने केली रैनाची पाठराखण
राजकोट : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत खराब फॉर्मात असलेल्या सुरेश रैनाची कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाठराखण केली. मोठे फटके खेळण्यापूर्वी खेळपट्टीवर काही वेळ घालविणे आवश्यक आहे, असा सल्ला धोनीने रैनाला दिला आहे.
रविवारी तिसऱ्या वन-डे सामन्यात १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला,‘फॉर्मपेक्षा त्याने खेळपट्टीवर जास्त वेळ घालविणे आवश्यक आहे. खेळपट्टीवर दाखल झाल्याबरोबर तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याने सुरुवातीला खेळपट्टीवर जम बसविणे गरजेचे आहे. खेळपट्टीवर दाखल होताच मोठे फटके खेळणे सोपे नसते. त्याने खेळपट्टीवर काही वेळ घालविला तर सर्वकाही सुरळीत होईल, असे माझे वैयक्तिक मत आहे.’
रैनाला गेल्या दोन सामन्यात खातेही उघडला आले नाही तर पहिल्या लढतीत तो तीन धावा काढून बाद झाला. टी-२० सामन्यांच्या मालिकेतही त्याला विशेष छाप सोडता आली नाही.
रविवारच्या सामन्याबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘खेळपट्टी संथ असल्यामुळे फलंदाजी करताना अडचण भासत होती. उपाहारापूर्वी खेळपट्टी वेगळी होती, पण त्यानंतर येथे फलंदाजी करणे जिकरीचे होते. जर खेळपट्टीमध्ये बदल झाला नसता तर २७० चे लक्ष्य गाठणे शक्य होते’, असेही धोनीने सांगितले.
धोनी पुढे म्हणाला,‘आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती आणि फिरकीपटूंना मदत मिळत नसतानाही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.