शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

जयवर्धने, संगकाराला पराभवाने निरोप

By admin | Updated: March 18, 2015 23:27 IST

श्रीलंकेचे अनुभवी खेळाडू माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले़

सिडनी : श्रीलंकेचे अनुभवी खेळाडू माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले़ वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे या वरिष्ठ खेळाडूंच्या वन-डे कारकिर्दीचा पराभवाने अखेर झाला़ संगकारा आणि जयवर्धने यांनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती़ या लढतीपूर्वी सलग ४ शतके झळकावून वर्ल्डकपमध्ये आपली नवी ओळख निर्माण करणारा संगकारा आफ्रिकेविरुद्ध ४५ धावांची खेळी करू शकला़ हा संघ ३७़२ षटकांत अवघ्या १३३ धावांत तंबूत परतला़ सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये संगकाराने ५४१ कुटल्या आहेत़ सध्या तो वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे़लंकेच्या माहेला जयवर्धनेने यापूर्वीच कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे़ आता हा खेळाडू वन-डे सामन्यातूनही निवृत्त झाला़ त्याने १९ शतके आणि ७७ अर्धशतकांसह ४४८ वन-डे सामन्यांमध्ये १२,६५० धावा केल्या आहेत़ मात्र, जयवर्धनेला सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही़ त्याला केवळ अफगाणिस्तानविरुद्धच शतकी खेळी करता आली होती़ १९९७मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा मी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करीन, असे वाटले नव्हते़ मात्र, आज श्रीलंका क्रिकेटमध्ये मला जे स्थान आहे, त्याचा अभिमान आहे़ - माहेला जयवर्धनेमहत्त्वाच्या सामन्यात आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, याची खंत आहे़ उच्च शिखरावर असताना कारकिर्दीची अखेर व्हावी, असे प्रत्येक खेळाडूला वाटते़ मात्र, प्रत्येक वेळी असे होत नाही़ असे असले, तरी मी देशासाठी दिलेल्या योगदानावर समाधानी आहे़ - कुमार संगकारा,