शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रविरुध्द युवा रिषभ पंतचा धडाकेबाज त्रिशतकी तडाखा

By admin | Updated: October 17, 2016 03:44 IST

युवा यष्टीरक्षक रिषभ पंत (३०८) याने झळकावलेल्या दमदार त्रिशतकाच्या जोरावर बलाढ्य दिल्लीने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटात महाराष्ट्राविरुध्द ५९० धावांची मजल मारली.

मुंबई : कारकीर्दीतील चौथाच प्रथम श्रेणी सामना खेळत असलेला युवा यष्टीरक्षक रिषभ पंत (३०८) याने झळकावलेल्या दमदार त्रिशतकाच्या जोरावर बलाढ्य दिल्लीने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटात महाराष्ट्राविरुध्द ५९० धावांची मजल मारली. परंतु, तरीही दिल्लीकर ४५ धावांनी पिछाडीवर राहिले. चौथ्या दिवशी पंत त्रिशतक झळकावून बाद झाल्यानंतर पुढील १३ धावांत दिल्लीचा डाव संपुष्टात आणून महाराष्ट्राने निर्णयाक आघाडी मिळवली.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व राहिले. महाराष्ट्राचा कर्णधार स्वप्निल गुगाळे आणि अंकित बावने यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५९४ धावांच्या विक्रमी भागीदारीची चर्चा सुरु असतानाच पंतने धडाकेबाज त्रिशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले. पंतने ३२६ चेंडूत ४२ चौकार आणि तब्बल ९ षटकारांची आतषबाजी करताना ३०८ धावांचा तडाखा दिला. त्याच्या या आक्रमकतेपुढे गुगाळेची खेळी काहीशी मागे पडली. परंतु, मोक्याच्यावेळी त्याला बाद करण्यात यश मिळवल्याने महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. तर, दिल्लीकरांना एका गुणावर समाधान मानाव लागले.विशेष म्हणजे, त्रिशतक पुर्ण केल्यानंतर पंत लगेच बाद झाला, त्यावेळी दिल्लीच्या धावफलकावर ७ बाद ५७७ धावा लागल्या होत्या आणि त्यानंतर केवळ १३ धावांत उर्वरीत ३ फलंदाजांना माघारी धाडत महाराष्ट्राने दिल्लीकरांना गुंडाळले. ५ बाद ३७६ धावांवरुन सुरुवात केलेल्या दिल्लीने पंतच्या जोरावर मोठी मजल मारली. चौथ्या दिवशी पंत वैयक्तिक १५५ धावांवर खेळत होता. यानंतर त्याने सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. पंतने वरुण सूद (नाबाद ३२) याच्यासह सातव्या विकेटसाठी निर्णायक १८२ धावांची निर्णायक भागीदारी केली. महाराष्ट्राकडून मोहसिन सय्यद (३/१२१) आणि चिराग खुराना (३/१४३) यांनी चांगला मारा केला. यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या महाराष्ट्राने दिवसअखेर बिनबाद ५८ धावा करुन सामना अनिर्णित राखला. पहिल्या डावात दणकेबाज त्रिशतक झळकावलेल्या गुगाळेला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)>संक्षिप्त धावफलक :महाराष्ट्र (पहिला डाव) : १७३ षटकात २ बाद ६३५ धावा (घोषित)दिल्ली (पहिला डाव) : १५५ धावांत सर्वबाद ५९० धावा (रिषभ पंत ३०८, ध्रुव शोरे ७१, मिलिंद कुमार ४५; मोहसिन सय्यद ३/१२१, चिराग खुराना ३/१४३)महाराष्ट्र (दुसरा डाव) : १५ षटकात बिनबाद ५८ धावा (हर्षद खाडिवले नाबाद ३८, चिराग खुराना नाबाद १९)